Mumbai News : रस्त्यांना पेव्हर ब्लॉकचे ठिगळ ; महापालिकेकडून रस्ते दुरुस्ती

khadde
khaddesakal
Updated on

Mumbai News : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनावर टीका केली जात आहे. अशातच खड्ड्यांत खडी टाकूनही ती सातत्याने उखडल्याने रस्त्यांची स्थिती सुधारली नाही.

आता पालिका प्रशासनाने पेव्हर ब्लॉकने खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत आणण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी कंत्राटदारांना दिल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्याने डांबर, कोल्ड मिक्स आणि पेव्हर ब्लॉकने खड्डे भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रस्त्यांना आता पेव्हर ब्लॉकचे ठिगळ लावले जात आहे.

khadde
Delhi Murder : आधी ७० हजार रुपयात पत्नीला घेतले विकत नंतर तिचाच केला खून !

पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर रस्त्यांची कामे युद्धपातळीवर केली जातात, मात्र या रस्त्यांची काही दिवसांतच चाळण होत असल्याने नव्या कोऱ्या रस्त्यांवर वाहने चालवण्याचे नागरिकांचे स्वप्न औटघटकेचे ठरते. गेल्या वर्षी रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पालिका प्रशासनावर सातत्याने टीकेची झोड उठवली जात असतानाही त्यावर ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरले होते.

khadde
Sangli Crime : घरी खेळत असताना चिमुरडी आरोपीच्या जवळ गेली अन् नराधमानं तिच्यावर..

पालिका अधिकाऱ्यांनी रस्त्यांचे पाहणी दौरे केले आणि खड्डे बुजवले जात असल्याचा दावा केला, मात्र ठराविक रस्त्यांवरील खड्ड्यांत केवळ बारीक-मोठी खडी, डेब्रीज टाकून खड्डे बुजवले जात होते. पाऊस सातत्याने सुरू असल्याने ही खडी, डेब्रीज टिकाव धरत नव्हते व खड्डे पुन्हा उखडत आहेत.

khadde
Mumbai : कचऱ्याच्या वर्गीकरणाला ठेंगा; पालिका कर्मचाऱ्यांकडूनच नियम धाब्यावर

पेव्हर ब्लॉकच्या बाजूलाच खड्डे

दुर्गाडी रस्त्यावरील खड्डे सध्याच्या घडीला पेव्हर ब्लॉक टाकून भरण्यात आले आहेत. यासोबतच घरडा सर्कल, द्वारली रोड, टिळक रोड येथील खड्ड्यांत पेव्हर ब्लॉक भरण्यात आले आहेत. वाहनांच्या वर्दळीमुळे हे पेव्हर ब्लॉकदेखील त्या खड्ड्यांत नीट बसत नाहीत.

khadde
Kalyan News : कल्याणमध्ये गुन्हेगाराचा निर्लज्जपणा, तरुणीवर अत्याचार केले तरी पश्चाताप नाही

आयुक्तांकडून रस्त्यांची पाहणी

पावसाने दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी रस्त्यांचा नुकताच पाहणी दौरा केला. दुर्गाडी रस्ता, डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल रोड, राजेंद्र प्रसाद रोड, डोंबिवली पश्चिम येथील देवीचा पाडा, शास्त्रीनगर रुग्णालय रोड, तसेच पंचायत बावडी रोड द्वारली आदी रस्त्यांची त्यांनी पाहणी केली.

khadde
Crime News: भररस्त्यात पत्रकाराला मारहाण; राऊत शिंदे गटावर भडकले, "हे कायद्याचे राज्य आहे का?"

संबंधित कंत्राटदारांना आठवडाभरात डांबर, कोल्ड मिक्स, पेव्हर ब्लॉकच्या माध्यमातून रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()