मुंबई: थंडीच्या आगमनासोबतच मुंबईतील प्रदूषणाची पातळी ही वाढली आहे. मुंबईच्या हवेचा स्तर वाईट नोंदवण्यात आला आहे. प्रदूषणामुळे सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास ही जाणवू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पहाटे अशा वातावरणात फिरणे, जॉगिंग करणे टाळावे असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
लॉकडाऊनमुळे मुंबईकरांना शुद्ध आणि स्वच्छ हवा अनुभवता आली. या काळात वाहनं, कारखाने, बांधकाम प्रकल्प बंद असल्याने प्रदूषणाची पातळी ही खाली आली होती. त्यामुळे मुंबईकरांना कधी नव्हे तो प्रदूषण विरहीत श्वास घेता आला. मात्र अनलॉक नंतर आता पुन्हा एकदा वायू प्रदुषणात वाढ होत असल्याचे दिसते.
अनलॉकनंतर महिन्याभरातच मुंबईत शहरात 211 एक्युआयसह हवा गुणवत्ता निर्देशांकाची वाईट नोंद झाली आहे. तर माझगाव परिसरात मुंबईतील सर्वाधिक प्रदूषण असल्याचे नोंद झाली आहे. तेथे 311 एक्युआय सह हवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर मालाड परिसरात सर्वाधित प्रदूषण असल्याचे नोंद झाली आहे. तेथे 307 एक्युआय सह हवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट नोंदवण्यात आला आहे. त्याखालोखाल चेंबूर 303 एक्युआय,बीकेसी 221 एक्युआय ,कुलाबा 197 एक्युआय नोंदवण्यात आला आहे.
सध्या मान्सून संपला असून थांडीची चाहूल सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत कोरडे वारे वाहू लागतात. वा-यांचा वेग ही मंदावतो. त्यामुळे हवेतील धुळीकण हे वर न जाता खालील स्तरावरच रेंगाळतात त्यामुळे प्रदुषणाच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसत असल्याचे सफरचे प्रमुख डॉ. गुफ्रान बेग यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून पहाटे गारवा जाणवतो. त्यात प्रदुषणाच्या पातळीत वाढ झाल्याने मुंबईत थंडी - खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. सकाळी थंड वातावरण असते शिवाय सकाळी दाट धुके पडते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही परिस्थिती असते. पहाटे अशा वातावरणात फिरणे, जॉगिंग करणे टाळावे. अशा वातावरणात फिरल्यास न्युमोनिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोवळं ऊन पडलं की बाहेर पडणं अधिक योग्य ठरेल असे शीव रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मोहन जोशी यांनी सांगितले.
परिसर | एक्युआय | पीएम |
मुंबई शहर | 211 | 2.5 |
माझगाव | 311 | 2.5 |
मालाड | 307 | 2.5 |
चेंबूर | 303 | 2.5 |
बीकेसी | 221 | 2.5 |
अंधेरी | 186 | 2.5 |
बोरिवली | 139 | 10 |
वरळी | 97 | 10 |
कुलाबा | 197 | 10 |
भांडूप | 112 | 10 |
नवी मुंबई | 225 | 2.5 |
-----------------------------------
(संपादनः पूजा विचारे)
Bad record of air level in Mumbai increase in cold-cough problem
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.