बदलापूरमध्ये आजपासून कडक लॉकडाउन

म्हणून असा निर्णय घेतला...
Osmanabad lockdown
Osmanabad lockdownOsmanabad lockdown
Updated on

ठाणे: मुंबई जवळ असलेल्या बदलापूरमध्ये (Badlapur) कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या बदलापूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यामुळे स्थानिक नगरपरिषदेने आज ८ मे पासून लॉकडाउनची (lockdown) कठोरपण अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या विनंतीनुसार शनिवारपासून आठवड्याभरासाठी कडक लॉकडाउन करण्यात येईल. हॉस्पिटल, बँका आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील, असे ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. (Badlapur announces strict COVID-19 lockdown from May 8)

आठ मे सकाळी सात वाजल्यापासून ते १५ मे सकाळी सातपर्यंत लॉकाडउनची कठोरपणे अमलबजावणी केली जाईल. या काळात किराणामालाची दुकाने, भाजी-फळांची दुकाने, बेकरी, मिठाईची दुकाने बंद राहतील. दुकानांमधून फक्त होम डिलिव्हरची सुविधा सुरु राहील, असे अधिसूचनेत म्हटले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यभरात निर्बंध लावल्यानंतरही बदलापुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

Osmanabad lockdown
मेट्रो संदर्भात नवी मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी

किराणा माल आणि बाजारपेठांमधील गर्दी हे या रुग्णवाढीमागे मुख्य कारण आहे. बदलापूरमधुन आतापर्यंत १९ हजार ३९३ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी १०१ जण कोरोना पॉझिटिव्ह आले. बदलापूरमध्ये २१० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या १,३७८ सक्रिय कोरोना रुग्ण बदलापूरमध्ये आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बदलापूरमध्ये ९१.८१ टक्के आहे. आतापर्यंत १७,८०५ रुग्ण कोरोनामधुन पूर्णपणे बरे झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.