Badlapur Assault Case: बदलापूरात बाप लेकीच्या नात्याला काळीमा! जन्मदात्याकडूनच 16 वर्षीय मुलीवर अत्याचार

Badlapur Assault Case: बदलापूरमधील प्रकरणानंतर नागरिक रस्त्यावर उतरले होते. इतकेच नव्हे तर पीडितेला न्याय मिळावा यासाठी त्यांनी 10 तासांपेक्षा अधिक काळ बदलापूर स्टेशनवर रेल्वे गाड्या रोखून धरल्या होत्या.
Badlapur Assault Case
Badlapur Assault CaseEsakal
Updated on

Badlapur Crime: बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने केलेले अत्याचाराचे प्रकरण उघड झाल्यापासून राज्यात मुली आणि महिलांविरोधात झालेल्या गुन्ह्यांच्या अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे राज्यातील जनतेमध्ये संताप निर्माण झाला आहे.

बदलापूरमधील प्रकरणानंतर नागरिक रस्त्यावर उतरले होते. इतकेच नव्हे तर पीडितेला न्याय मिळावा यासाठी त्यांनी 10 तासांपेक्षा अधिक काळ बदलापूर स्टेशनवर रेल्वे गाड्या रोखून धरल्या होत्या.

हे प्रकरण ताजे असतानाच बदलापूरमधूनच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने आपल्याच 16 वर्षांच्या मुलीवर अनेकवेळा अत्याचार केले आहेत. मुलीच्या आईने तक्रार नोदंवल्यानंतर पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत. याबाबतचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

दरम्यान पीडित मुलीवर बापाने अनेकवेळा अत्याचार केले आहेत. इतकेच नव्हे तर तो मुलीला मारहाणही करायचा. 22 ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पीडिती मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितल्यानंतर, आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Badlapur Assault Case
Mumbai Weather And Rain Updates: मुंबईचं हवामान कसं असणार? पुण्यासह राज्यात काय परिस्थिती? IMD ने दिली महत्त्वाची माहिती

पीडीत मुलगी बदलापूरातील एका परिसरात आपल्या आईबरोबर राहते. तिची आई एका कंपनीत कामाला जाते. तिला घरी यायला रात्री उशीर होतो. 22 ऑगस्ट रोजी पीडित मुलगी अचानक घरातून पळून गेली. अनेक ठिकाणी शोधूनही न सापडल्याने त्यांनी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार केली. पण पोलिसांनी शोध सुरू करण्यापूर्वीच ती घरी परतली.

घरी परतल्यानंतर पीडितेने आईला सांगितले की, वडिल तिच्यावर सतत अत्याचार करत असतात. यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली.

Badlapur Assault Case
Kangana Ranaut: ठाकरे सरकारने घरावर चालवला होता हातोडा... आता कंगनाने मुंबईत करोडो रूपयांच्या जमिनीचा केला सौदा! काय आहे प्लॅन?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.