कळवा - बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदे याच्यावर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केलेल्या पोलीस चकमकीत मृत्यू झाला. असे असताना त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांनी गोळीबार करून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करून त्यांच्या वकिलाच्या हस्ते पोलिसाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
याची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 25) ला पोलिसांच्या चकमकीवर शंका उपस्थित करून त्याचा मृतदेह बदलापूर येथील शासनाच्या जागेत अंत्यसंस्कार करावे, जेणे करून फॉरेन्सिकलॅब फिंगर प्रिंट पथकाला यापुढे कधी अजून चौकशी करण्यासाठी अडचण येणार नाही. असा आदेश दिल्याने आता पोलिसासमोर नवीन पेच निर्माण झाला आहे.
त्याच्या पालकांनी त्याचा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात असलेला मृतदेह घेऊन जाण्यास तयार असून, हे घेऊन जाण्यासाठी पोलीस बंदोबस्त व बदलापूरमध्ये जागा मिळवून देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व बदलापूरच्या नागरिकांनी बदलापूरमध्ये नराधम अक्षय शिंदे याचा अंत्यसंस्कार करू न देण्याचा पवित्रा घेतल्याने बदलापूरमध्ये कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उभा राहू शकतो. त्यामुळे हा प्रश्न बदलापूर पोलीस व बदलापूर नगरपालिका कसा सोडविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.