Badlapur Case: बदलापूर अत्याचार प्रकरण; तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना जामीन मंजूर, SIT ने घेतलं होतं ताब्यात

Badlapur Sexual Abuse Case Latest Updates: बदलापूर अत्याचार प्रकरणी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. २५ हजारांच्या जातमुचक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे.
Tushar Apte and Uday Kotwal
Tushar Apte and Uday KotwalESakal
Updated on

Maharashtra Crime Updates: बदलापूर अत्याचार प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. शाळेचे संचालक तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना २५ हजार जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. एसआयटी टीमने दोघांना आज कल्याण न्यायालयात हजर केले होते. काल यांचा एका गुन्ह्यात जामीन झाला होता तर दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीने तत्काळ यांना ताब्यात घेतले होते. मात्र आता त्यांना जामीन देण्यात आला आहे.

बदलापूर बलात्कार प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने शाळेचे संचालक तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना अटक केली होती.गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी ताब्यात घेतले. मुंबई उच्च न्यायालयाने कोतवाल आणि आपटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर एका दिवसात ही अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना जामीन मंजूर केला.

Tushar Apte and Uday Kotwal
धक्कादायक घटना! CM एकनाथ शिंदेंच्या बंदोबस्ताला जाताना मोठा अपघात, १२ पोलीस जखमी

दरम्यान बदलापूर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पोलीस चकमकीत ठार झाला होता. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेला त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या नवीन गुन्ह्याच्या संदर्भात तळोजा कारागृहातून बदलापूरला नेले जात होते. त्यादरम्यान त्याने पोलीस कर्मचाऱ्याकडून शस्त्र हिसकावले आणि गोळीबार केला. मुंब्रा बायपासजवळ झालेल्या गोळीबारात अक्षय शिंदे जखमी झाला होता आणि नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने बुधवारी बदलापूर येथील शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना ताब्यात घेतले होते. पोलीस बुधवारी रात्री आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना कडक बंदोबस्तात वैद्यकीय तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. POCSO च्या २१ च्या संबंधित कलमांखाली बदलापूर शाळेच्या विश्वस्त आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय शिंदेने केलेल्या दोन चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटीने दोन वेगवेगळे आरोपपत्र दाखल केले आहेत. कोतवाल आणि आपटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. जिथे ती फेटाळण्यात आली होती. हे दोघे अनेक दिवसांपासून एसआयटी आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांना टाळत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.