Mumbai Latest News: बदलापूरमध्ये ‘सकाळ’च्या महिला पत्रकाराचा विनयभंग करणाऱ्या माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी वामन म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. न्या. संदीप मारणे यांनी आज (ता. ७) हा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
बदलापूर घटनेनंतर संतप्त नागरिकांनी केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या ‘सकाळ’च्या स्थानिक महिला पत्रकाराला वामन म्हात्रे यांनी अर्वाच्य भाषेत धमकावत विनयभंग केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वामन म्हात्रे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. संदीप मारणे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीवेळी महिला पत्रकाराच्या वतीने न्यायालयात ॲड. समीर वैद्य, ॲड. विनोद सातपुते व ॲड. शीतल सातपुते यांनी युक्तिवाद केला.
त्यांनी न्यायालयाला सांगितले की, अर्जदाराने भररस्त्यात अश्लाघ्य भाषेत महिला पत्रकाराला विचारणा केली. महिला पत्रकार कोणत्या जातीची आहे, याची म्हात्रे यांना जाणीव होती, त्यामुळे ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
वामन म्हात्रे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यास तडीपार करण्यात यावे, कारण ते पुन्हा महिला पत्रकाराला धमकावू शकतात. म्हात्रे यांच्या वकिलांनी हा युक्तिवाद फेटाळून लावत जामीन देण्याची मागणी केली. न्यायालयाने सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला होता. आज हा निकाल जाहीर करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.