Blast: भल्या पहाटे धातूचा तुकडा घरावर पडला अन् निष्पाप व्यक्तीने गमावले दोन्ही पाय; बदलापूर MIDC मध्ये स्फोटामुळे विचित्र अपघात

Badlapur MIDC: पीडित झोपेत असताना त्यांच्या घरावर धातूचा तुकडा पडला आणि छतावरून तो थेट घरात आला. तो घरात झोपलेल्या एका व्यक्तीच्या पायावर पडल्याने त्याला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले.
Badlapur MIDC Blast
Badlapur MIDC BlastEsakal
Updated on

बदलापूर एमआयडीसीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे एका औषध कंपनीत रिॲक्टरमध्ये झालेल्या स्फोटामुळे एका व्यक्तीला त्याचे पाय गमवावेल लागले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

औषध कंपनीच्या रिॲक्टरमधील स्फोटामुळे धातूचा एक तुकडा परिसरातील घरावर पडला, त्यामुळे एका व्यक्तीला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले. त्याचवेळी त्यांची पत्नी आणि मुलगीही जखमी झाली.पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

बदलापूर अग्निशमन केंद्राचे मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनवणे यांनी सांगितले की, बदलापूर एमआयडीसीच्या खरवई गावात असलेल्या औषध कंपनीच्या रिॲक्टरच्या रिसिव्हर टँकमध्ये स्फोट झाला.

ते म्हणाले की, यानंतर रिॲक्टर युनिटमध्ये आग लागली. माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

Badlapur MIDC Blast
Sharad Pawar: "राज ठाकरेंचं राजकारण मॅच फिक्सिंगवर..." शरद पवारांवरील टीकेचे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तर

अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातस्थळापासून 300 ते 400 मीटर अंतरावर धातूचा तुकडा उडून गावातील एका घरावर पडला. त्यामुळे घरात उपस्थित असलेले लोक जखमी झाले. घरावर धातूचा तुकडा पडला तेव्हा पीडित झोपले होते, असे त्यांनी सांगितले.

यामुळे घरातील एका व्यक्तीला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले. त्यांच्या मुलीलाही पायाला दुखापत झाली असून पत्नीलाही दुखापत झाली आहे. दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Badlapur MIDC Blast
काळ्या मातीत मातीत...! पुण्याच्या शेतकऱ्याने अमेरिकेत फुलवली शेती, पाहा गावाच्या आठवणीत बुडवणारा Video

पोलिसांनी देलेल्या माहितीनुसारी, पीडित झोपेत असताना त्यांच्या घरावर धातूचा तुकडा पडला आणि छतावरून तो थेट घरात आला. तो घरात झोपलेल्या एका व्यक्तीच्या पायावर पडल्याने त्याला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले.

यामध्ये पीडित व्यक्तीच्या पत्नी आणि मुलीच्या पायालाही दुखापत झाली आहे. या दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या व्यक्तीला नंतर पुढील उपचारासाठी मुंबईतील सरकारी जे जे रुग्णालयात हलवण्यात आले, असे बदलपूर पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदा शितोळे-शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.