- मोहिनी जाधव
बदलापूर - आधीच बदलापूर मधील रेल्वे प्रवाशांची साडेसाती संपत नाही तोच, रेल्वे प्रशासनाने नव्या होणाऱ्या पुलासाठी चक्क बदलापूर स्थानक असल्यापासून अनेक वर्षे बदलापूरकर प्रवास करत असलेले, फलाट क्रमांक एक प्रवसासाठी पूर्णपणे बंद करणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने, होम प्लॅटफॉर्म वरुनच आता बदलापूर लोकल पकडण्यासाठी बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे बदलापूरचे रेल्वे प्रवासी मात्र संतप्त झाले आहेत.
बदलापूर रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याच्या नादात, रेल्वे प्रशासनाने मुंबईच्या दिशेने असलेल्या टोकाकडून ते अगदी कर्जतच्या दिशेकडील शेवटच्या टोकापर्यंत बारा मीटर लांबीच्या मोठ्या पुलाचे काम मंजूर केले आहे. या पुलावर अत्याधुनिक दृष्ट्या सोयी देण्यात येणार आहे.
मात्र हा पूल उभारण्यासाठी आवश्यक पिलर साठी फलाट क्रमांक एक व दोन वरील जागा अपुरी पडत असल्याने, रेल्वे प्रशासनाने एक नंबर फलाट पूर्णपणे बंद करुन त्या ठिकाणी पुढील आठवड्यातच पोलादी कुंपण घालण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे आता फलाट क्रमांक एक बंद झाल्यावर बदलापूरहुन मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होम प्लॅटफॉर्म झालेल्या फलाटावरुनच बदलापूर लोकल साठी प्रवास करावा लागणार आहे.
आधीच होम प्लॅटफॉर्म होणार त्यामुळे, बदलापूर लोकल ला चढण्यासाठी होणारी एकाच फलाटावरची गर्दी, ही होम प्लॅटफॉर्ममुळे विभागून रेल्वेत चढण सोयीस्कर जाईल या आशेत बदलापूरकर असताना, रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे आता बदलापूरकर संतप्त झाले आहेत. हा निर्णय मध्य रेल्वे विभाग मुंबई कार्यालयातून घेण्यात आला असून, या निर्णयावर रेल्वे स्टेशन मास्तर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
रेल्वेच्या नव्या निर्णयानुसार संपूर्ण फलाटाच्या वरील भागात मुंबई तर कर्जत दिशेने सलग १२ मिटर चा डेक अर्थात बंदिस्त पुल उभारण्यात येणार आहे. ज्यावर आधुनिक दृष्ट्या पुलावरच तिकीट घर, रेल्वे स्टेशन मास्तर चे कार्यालय, शौचालय, खानपाणाचे स्टॉल, प्रतीक्षागृह अश्या सुविधा व या पुलावरून फलाटावर उतरण्यासाठी एस्केलेटर, जीना, लिफ्ट सारख्या सोयी मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले असून, या भल्या मोठ्या पुलाचे बांधकाम करताना, पुलाचा आधार असलेले मोठमोठे पिलर अर्थात खांब हे फलाटावर येणार आणि एक व दोन नंबर च्या फलाटावर यासाठी जागा अपुरी असल्याने, फक्त कर्जतकडे जाणाऱ्या लोकलसाठी दोन नंबरचा फलाट सुरु ठेऊन, आता होम प्लॅटफॉर्म चे काम झाल्याने, हाच फलाट बदलापूरकरांना बदलापूर लोकलसाठी वापरता येणार आहे व आता सध्याचा एक नंबरचा फलाट कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.
मुख्य म्हणजे बारा मीटर लांबीच्या पुलाचे काम हाती घेण्यात आले असले तरी, हे काम पूर्ण होण्यास मे २०२४ पर्यंतचा अवधी दिला असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र आधीच होम प्लॅटफॉर्मला झालेला उशीर यामुळे पुलाचे बांधकाम देखील, या चार महिन्यात पूर्ण होतंय की, याला देखील चार वर्षे लागतात हे आता येणारा काळच सांगेल.
प्रवासी प्रतिक्रिया
काल पासूनच बदलापूर रेल्वे स्थानकात सुरु असलेले काम मी पाहत आहे. यावर विचारणा केल्यावर वरिष्ठ विभागातून आम्हाला हे काम करण्याचे आदेश आल्याचे कामगारांनी सांगितले. मात्र आज स्टेशन मास्तर यांनी फलाट क्रमांक एक कायमस्वरूपी बंद होणार ही माहिती दिली असता, बदलापूर चा रेल्वे प्रवासी म्हणून मी या निर्णयाचा धिक्कार करतो.
कारण, आधीच होम प्लॅटफॉर्म वर फलाटाची जागा अपुरी आहे. त्यात आता आधीचे एक नंबर फलाट बंद झाल्याने, होम प्लॅटफॉर्म वर सगळ्या गर्दीचा भार पडणार. त्यामुळे बदलापूरकरांना विकासाच्या नावाखाली सर्रासपणे फसवणूक केली जात आहे. आणि यात लोक प्रतिनिधी देखील तितकेच जबाबदार आहेत. रेल्वेच्या या नव्या निर्णयाचा बदलापूर रेल्वे प्रवाशांनी खरपूस समाचार घेतला पाहिजे.
- दशरथ जाधव, प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.