बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण देशभरातून याविरोधात संताप व्यक्त होत आहे. सकाळपासून स्थानिक नागरिकांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
आता राज्य सरकारने या प्रकरणी कठोर पाऊले उचलत वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर दोषींवर लवकरात लवकर कारवाई होऊन शिक्षा व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा प्रस्ताव सादर करावे असे आदेश ठाने पोलीस आयुक्तांना दिले आहे. याबाबतची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली.
दरम्यान आरोपींना तत्काळ फाळी द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ही न्यायालयीन प्रक्रिया असून यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही."
अल्पवयीन मुलींवर आत्याचार केल्याप्रकरणी 17 ऑगस्ट रोजी पोलिसांनी शाळेतील आरोपी सफाई कामगाराला अटक केली होती. बालवाडीत शिकणाऱ्या तीन व चार वर्षांच्या दोन मुलींचा छळ केल्याचा आरोप या व्यक्तीवर होता. मुलींच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शाळेतील स्वच्छतागृहातच सफाई कर्माचाऱ्याने मुलींची छळ केला होता.
हा प्रकार मुलींनी आपल्या पालकांना सांगितला होता. यानंतर याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आणि आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर त्याला अटक करण्यात आली.
शाळेच्या व्यवस्थापनाने सोमवारी या घटनेवर एक निवेदन जारी केले आणि सांगितले की, मुख्याध्यापकांसह, एका वर्ग शिक्षक आणि एका महिला सफाई कर्मचाऱ्याला देखील निलंबित केले आहे. शाळेने या घटनेबद्दल माफीही मागितली आहे.
मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी सध्या बदलापूरात मोठा गदारोळ सुरू आहे. येथे मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत. नागरिकांनी सकाळपासून लोकल ट्रेनही रोकल्या आहेत. हजारो लोकांसह मुलींच्या पालकांनी शाळेला घेराव घालून सकाळपासून निदर्शने सुरू केली आहेत.
या घटनेविरोधात लोकांचा रोष उफाळून आला आहे. हजारो लोक एकत्रित आले असून आरोपींवर कडक कारवाईची मागणी करत आहेत. आज सकाळी 8 वाजता लोकांनी लोकल गाड्या थांबवून याचा निषेध नोंदवला आहे.
यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी तपासाचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.