Badlapur School Crime: मी तर तोंड फोडलं असत; शिवसेना नेते वामन म्हात्रेंच्या कृत्यावर चित्रा वाघ संतापल्या

Chitra Wagh: सगळ्या ठिकाणी पोलीस पोलीस पोलीस करुन कसं जमेल.. मी सक्षम आहे ना.. मी पत्रकार आहे
Badlapur School Crime: मी तर तोंड फोडलं असत; शिवसेना नेते वामन म्हात्रेंच्या कृत्यावर चित्रा वाघ संतापल्या
Updated on

शर्मिला वाळुंज

Latest Badlapur News : काम करताना आपल्याला अशा प्रकारचा अनुभव येतो. जेव्हा येतो तेव्हा ऐकत बसू नका...तिथल्या तिथे उत्तर द्या आणि मग पोलिसांकडे जा... अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बदलापूर येथील घटनेचा आढावा घेतल्यावर दिली.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ या बुधवारी बदलापूर येथे आल्या होत्या. शाळकरी चिमुरड्यांवर झालेला अत्याचार आणि

त्याचप्रमाणे या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराविषयी अर्वाच्च भाषा वापरणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वातील शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांच्यावरही चित्रा वाघ यांनी भाष्य केलं आहे. 'तू अशा बातम्या देतेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे' अशी बेताल टिपण्णी म्हात्रेंनी केली होती. यावर बोलताना "तिथल्या तिथे त्याचं थोबाड का नाही फोडलं?" असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला.

Badlapur School Crime: मी तर तोंड फोडलं असत; शिवसेना नेते वामन म्हात्रेंच्या कृत्यावर चित्रा वाघ संतापल्या
Kalyan: चार वर्षांपासून फरार असलेल्या अमली पदार्थ तस्कराला पोलीसांनी केली अटक, वाचा कसा रचला सापळा

त्या म्हणाल्या, मला हा मुद्दा आता समजला. गुन्हा का नोंद होत नाही याविषयी मी पोलिसांशी बोलते, पण मला असं वाटतं, की कोणीही असूदे, ज्यावेळी असं आपल्याला कुणी बोलतं, तुम्ही का नाही त्याचं थोबाड फोडलं? तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होतं. एवढं ऐकून घेईपर्यंत... मी जर काम करत असताना, मला जर कोणी बोलणार असेल, तर तो कोण आहे, हे मी बघणार नाही हो.. ज्या पद्धतीने आपल्याला असं बोललं जातंय, पोलिसांनी गुन्हा नोंद करायलाच पाहिजे, पण एक महिला म्हणून... सगळ्या ठिकाणी पोलीस पोलीस पोलीस करुन कसं जमेल.. मी सक्षम आहे ना.. मी पत्रकार आहे, मी राजकीय कार्यकर्ती आहे.. मला जर कोणी बोललं तर मी तिथल्या तिथे त्याचं थोबाड फोडेन आणि मग पोलिसांना सांगेन आता करायचं ते करा.." असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Badlapur School Crime: मी तर तोंड फोडलं असत; शिवसेना नेते वामन म्हात्रेंच्या कृत्यावर चित्रा वाघ संतापल्या
Kalyan: स्थानिकांचा विरोध अन् मनसेच्या राजू पाटलांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; कल्याणमध्ये नक्की काय सुरु आहे?

माझ्या सहकाऱ्यांनाही सांगणं आहे. राजकारणात काम करताना आपल्याला अशा प्रकारचा अनुभव येतो. येतो तेव्हा ऐकत बसू नका.. तिथल्या तिथे उत्तर द्या आणि मग पोलिसांकडे जा... तुमच्या केसबद्दल कथोरे साहेब, आपल्याला साहेबांना सांगायला पाहिजे.. अशा पद्धतीने कोणी बोलत असेल, तर ते खपवून घेतलं जाणार नाही... हे पूर्णपणे चुकीचं आहे.. ती पत्रकार आपलं काम करत होती.. तिला अशा पद्धतीने बोलण्याचा कुणाला अधिकार नाही" असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं.

Badlapur School Crime: मी तर तोंड फोडलं असत; शिवसेना नेते वामन म्हात्रेंच्या कृत्यावर चित्रा वाघ संतापल्या
Kalyan Railway: कल्याण स्टेशन परिसराची परिस्थिती सुधाणार? खासदारांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.