मुंबई- बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. या मुद्द्यावरून पालक आक्रमक झाले होते. त्यानंतर सरकारने याप्रकरणी दखल घेत एसआयटीची स्थापना केली होती. या एसआयटीने आपला प्राथमिक रिपोर्ट सादर केल्याचं कळत असून यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपी अक्षय शिंदे याने एकवेळा नाही तर अनेकवेळा चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केला आहे. याशिवाय तो कोणत्याही बंधनाशिवाय चिमुकलींपर्यंत पोहोचू शकत होता. त्याला कोणताही अटकाव करण्यात आला नव्हता, असं एसआयटी रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. 'Times Now'ने यासंदर्भातील रिपोर्ट समोर आणला आहे.