मुंबई : बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. यासाठी त्यांनी गेल्या सात तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानक रेल रोको आंदोलन केलं आहे. तसंच आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. यावेळी सरकारच्यावतीनं आंदोलकांशी मध्यस्थीसाठी गिरीश महाजन या ठिकाणी आले पण संतप्त नागरिकांनी त्यांच्या विनंतीलाही जुमानलं नाही.