Badlapur School Crime: बदलापूर प्रकरणात पोलिसांना आले आदेश; आंदोलकांवर बळाचा वापर; लाठीचार्ज अन् बेदम मारहाण

Badlapur Crime News: मागच्या आठ ते दहा तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये आंदोलन सुरु आहे. पोलिसांनी मध्यस्थी केली होती. मंत्री गिरीश महाजन यांनीही आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थिती नव्हते...
badlapur school case police
badlapur school case police esakal
Updated on

Badlapur Latest News: बदलापूरमध्ये मागच्या आठ ते दहा तासांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला गालबोट लागलं आहे. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज सुरु केलाय. आंदोलकांना पोलिसांकडून मारहाण होत आहे.

दोन चिमुकल्या मुलींवर शाळेमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर बदलापूरमध्ये जमाव संतप्त झाला. मंगळवारी जमावाने शाळेची तोडफोड केली. त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये जात रेल रोको आंदोलन सुरु केले.

मागच्या आठ ते दहा तासांपासून रेल्वे स्थानकामध्ये आंदोलन सुरु आहे. पोलिसांनी मध्यस्थी केली होती. मंत्री गिरीश महाजन यांनीही आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थिती नव्हते.

आरोपीला आत्ताच फाशी द्या, अशी आंदोलकांची मागणी आहे. शेवटी पोलिसांनी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान आंदोलकांवर लाठीचार्ज केला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लाठीचार्ज झाल्याचं सांगितलं जातंय.

त्यानंतरही आंदोलकांनी दगडफेक सुरु केली. पुन्हा आंदोलक रेल्वे स्थानकाकडे धाव घेत आहेत. पोलिसही लाठा-काठ्यांचा मारा देऊन आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकाएका आंदोलकाला तीन-तीन पोलिस मारहाण करत असल्याची दृष्ट वृत्तवाहिनीवर प्रसारित झाली आहेत.

badlapur school case police
Viral Video : एअरपोर्टवर रामचरणला घ्यायला आला त्याचा खास मित्र ; बॉण्ड पाहून नेटकरी म्हणाले...

आरोपी अक्षय शिंदेला तातडीने फाशी द्यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. परंतु सरकारने हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालेल, असं आश्वासन दिलं आहे. मात्र आंदोलक ठाम आहेत. त्यामुळेच पोलिसांनी शेवटचा पर्याय म्हणून बळाचा वापर सुरु केला आहे.

दरम्यान, आरोपी अक्षय हा पाच ते सहा महिन्यांपासून शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता. आरोपी अक्षयला पाहताच पोलिसांना त्याच्या विकृत मनस्थितीची जाणीव झाली. मात्र, ही बाब शाळा प्रशासनाच्या लक्षात का आली नाही? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.