गेल्या काही दिवसांपासून कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण चर्चेत आहे. यादरम्यान बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. स्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात असून आज बदलापूरचे नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. या घटनेतील आरोपील कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली.