Badlapur School Crime: लाडकी बहि‍ण नको न्याय द्या! संतप्त आईचा सवाल! बदलापूर घटनेत आरोपींना फाशी देण्याची मागणी

Badlapur School Sexual Abuse Case: बदलापुरातील एका शाळेत चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाला. संतप्त कुटुंबाने बदलापुर बंदची हाक दिली आणि कारवाईची मागणी केली.
Protesters in Badlapur block the railway tracks demanding justice for the victims of the recent abuse case.
Protesters in Badlapur block the railway tracks demanding justice for the victims of the recent abuse case.esakal
Updated on

बदलापुरातील एका नामांकित शाळेत २ चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लघुशंकेसाठी जात असताना शाळेतील कर्मचाऱ्याने या चिमुकलींवर अत्याचार केला. या घटनेनंतर, संबंधित कुटुंबाला तक्रार दाखल करण्यासाठी १२ तास लागले. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. संतप्त कुटुंब रस्त्यावर उतरले प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त केली आहे.

पोलिसांची बदली, पण कारवाईचा अभाव-

घटनेनंतर संबंधित पोलिसांची बदली करण्यात आली आहे, पण कारवाई करण्यात आलेली नाही. संतप्त कुटुंबाने बदलापुर बंदची हाक दिली असून, आज शहरात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. शाळेच्या मुख्यध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे, परंतु या घटनाबाबत अधिक ठोस कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बदलापुर रेल्वे ट्रकवर लोकल थांबवली-

संतप्त लोकांनी बदलापूर रेल्वे ट्रकवर लोकल थांबवली आहे. ठाण्याचे पालकमंत्री शंभुराद देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, १२ तारखेला घडलेल्या या प्रकरणाला दाबण्याचा आरोप कुटुंबाच्या वतीने करण्यात आला आहे.

राजकीय नेत्यांचे उदासीनतेवर संताप-

आंदोलनात आतापर्यंत एकही राजकारणी उपस्थित आला नाही. दहीहंडीच्या काळात राजकीय नेत्यांची गर्दी असते, पण चिमुकलींवर अत्याचार झाला तरी कोणीही आलेले नाही. संतप्त आईने राजकारण्यांना प्रश्न केला आहे, "तुम्ही आम्हाला लाडकी बहिणी म्हणता, तर लाडक्या बहिणीच्या मुलीला न्याय देण्यासाठी कुठं आहात तुम्ही?"

Protesters in Badlapur block the railway tracks demanding justice for the victims of the recent abuse case.
Mumbai Rains: मुंबईकरांनो सावधान! दीर्घकाळ मुसळधार पावसाचा इशारा, कामाचं नियोजन करण्यापूर्वी हवामान अंदाज वाचा

प्रशासनाकडे न्यायाची मागणी-

संतप्त आईने पुढे सांगितले, "लाडकी बहिणीच्या मुलीला न्याय द्या, आम्हाला तुमचा पैसा नको. दिड हजाराने काही होणार नाही. आमच्या लेकरांना न्याय द्या, प्रशासनाच्या भरवशावर आम्ही कामाला जातो. आमच्या मुली सुरक्षित नसतील तर आम्ही काम कसं करणार?"

चिमुकलींच्या सुरक्षिततेसाठी आवाज-

आईने स्पष्टपणे सांगितले की, "आम्ही मुलींना गुड टच-बॅड टच शिकवतो. पण त्या नराधमांना काय कळतं? लहान लेकरं काय समजणार? मी जगातील महिलांना सांगते की मुलांना महिलांचा सन्मान शिकवा."

या घटनामुळे बदलापुरात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात असून, संबंधित प्रशासन व राजकारण्यांनी या प्रकरणात लवकरात लवकर ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे.

Protesters in Badlapur block the railway tracks demanding justice for the victims of the recent abuse case.
Mumbai Crime : दिल्ली-मुंबई इंडिगो फ्लाईटमध्ये प्रवासी महिलेशी लैंगिक अत्याचार प्रकरणी 47 वर्षीय प्राध्यापकाला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.