Akshay Shinde : मोठी अपडेट! बदलापूर प्रकरणात शाळेचा अध्यक्ष अन् सचिवाला कोर्टाचा दणका

badlapur school case who is akshay shinde
badlapur school case who is akshay shindeesakal
Updated on

Badlapur School Crime: बदलापूर येथील एका शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर बदलापुरात मोठा आगडोंब उसळला होता. या प्रकरणात मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळ्या चालवल्याचं सांगितलं जातं. परंतु अक्षयच्या नातेवाईकांनी कोर्टात धाव घेतल्याने प्रकरणाची सुनावणी सुरु झाली आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट हाती आली असून ज्या शाळेमध्ये ही दुर्दैवी घटना घडली होती त्या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

न्यायमूर्ती लड्डा यांच्या खंडपीठाने दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड झाल्याचं उच्च न्यायालयाचं मत असून शाळेच्या ट्रस्टींना घटनेची कल्पना असूनही त्यांनी ती लपवली असं कोर्टाने म्हटलं आहे.

तसेच गुन्ह्याची माहिती मिळाल्यांतरही स्थानिक पोलिसांना माहिती देण्यास शाळेच्या विश्वस्तांनी टाळाटाळ केली, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं. गुन्हा दाखल होण्याच्या आधीच ते फरार झाले तसेच घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज गायब आहे.. आम्ही त्यांना शोधण्यात अजूनतरी अपयशी ठरलो आहोत, असं राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात कबुली दिली.

badlapur school case who is akshay shinde
Pooja Khedkar: खेडकर प्रकरणात मोठी अपडेट, पटियाला हाऊस कोर्टाचा दणका

नेमकं आत्तापर्यंत काय घडलं?

  • बदलापूर येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन ४ वर्षांच्या मुलींवर २३ वर्षीय पुरुष सफाई कर्मचाऱ्याने मुलींच्या शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे

  • या दोन चिमुरड्यांवर १२ - १३ ऑगस्ट २०२४ रोजी दोन लैंगिक आत्याचार झाले.

  • शाळेकडून मुलींच्या टॉयलेटजवळ महिला कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नव्हती.

  • या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची १ ऑगस्ट २०२४ रोजी काँट्रॅक्ट वर नेमणूक करण्यात आली होती.

  • आरोपीकडे शाळेतील मुलींचे टॉयलेट साफ करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

  • शनिवारी रात्री मुलींच्या पालकांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

  • एका मुलीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर हे सर्व प्रकरण उजेडात आले.

  • या मुलीच्या पालकांनी तिच्या सोबत राहणाऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क केल्यावर त्यांनी देखील त्यांची मुलगी काही दिवसांपासून शाळेत जाण्याबद्दल घाबरलेली असते असे सांगितले.

  • यानंतर पालकांनी त्यांच्या मुलींची डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले.

  • यानंतर बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला, यावेळी पोलिसांनी गु्न्हा नोंदवून घेण्यास दिरंगाई केल्याचा आरोप देखील केला जात आहे.

  • सोमवार, दि. २३ सप्टेंबर रोजी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, असं सांगितलं जातंय.

  • या प्रकरणी अक्षय शिंदेच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर सुनावण्या सुरु झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.