Badlapur School Crime: पोक्सोचा गुन्हा असूनही सहा दिवसांपासून संस्थाचालक फरार, पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी

Mumbai Crime News: उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे आणि मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्या विरोधात देखील पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Badlapur School Crime: पोक्सोचा गुन्हा असूनही सहा दिवसांपासून संस्थाचालक फरार, पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी
Updated on

बदलापूर चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शिंदे याच्यासोबतच या प्रकरणात कल्याण जिल्हा सत्र न्यायालय आदेशानुसार शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे आणि मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्या विरोधात देखील पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटले आहेत मात्र अद्याप संस्थाचालक फरार असून पोलिसांच्या ते हाती लागलेले नाहीत. आंदोलन कर्त्यांवर ज्या तत्परतेने कारवाई करण्यात येत आहे तीच तत्परता पोलिस प्रशासनाने संस्थाचालकांना अटक करण्यात दाखवावी अशी मागणी बदलापूरकर करत आहेत.

Badlapur School Crime: पोक्सोचा गुन्हा असूनही सहा दिवसांपासून संस्थाचालक फरार, पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी
Badlapur School Crime: आरोपी शिंदेला पोलिसांनी त्या चिमुकल्या मुलींसमोर आणलं अन्... वाचा ओळख परेडवेळी नक्की काय घडलं

बदलापूर येथे एका नामांकित शाळेत चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटी तपास सुरु आहे. शाळेतील कर्मचारी अक्षय याची ओळख परेड न्यायालयात पंचासमक्ष झाली असून चिमुरड्यांनी काठीवाला दादाला ओळखले असल्याची माहिती आहे. याच प्रकरणात संबंधित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे व मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाल आणि आपटे हे पोलिसांसमक्ष पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही पोलिसांना यांचा शोध लागलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे आंदोलन कर्त्यांवर पोलिस प्रशासन, रेल्वे पोलिसांनी गुन्हे दाखल करत आंदोलकांना अटकही केली गेली.

मात्र या तिघांना पोलिसांनी अद्याप अटक केली नसल्याने बदलापूरात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. जी तत्परता आंदोलन कर्त्यांना अटक करण्यात दाखवली तीच तत्परता संस्थांचालकांच्या बाबतीत देखील पोलिसांनी दाखवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

Badlapur School Crime: पोक्सोचा गुन्हा असूनही सहा दिवसांपासून संस्थाचालक फरार, पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी
Badlapur School Crime: मोठी बातमी; आरोपी अक्षय शिंदेची चिमुकल्यांसमोर होणार ओळख परेड!

आंदोलन प्रकरण पत्रकारांवर गुन्हे

बदलापूरमध्ये हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूरकरांनी शाळेच्या बाहेर आंदोलन करत शाळेची तोडफोड केली होती. याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांचाही समावेश करण्यात आला आहे. पत्रकार ठोंबरे यांना गुन्हे शाखेने अटक करण्याचा इशारा देत चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

आंदोलनाच्या दिवशी श्रद्धा या शाळेबाहेर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून वार्तांकन करत होत्या. मात्र आंदोलकांची संख्या वाढू लागताच ठोंबरे यांना पोलिसांनी स्वतः गर्दीतून बाहेर काढले. संतप्त आंदोलकांनी शाळेची तोडफोड केली. यावेळी श्रद्धा या सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश वराडे यांच्या सोबत शाळा परिसरात होत्या. मात्र आता या प्रकरणात श्रद्धा यांचे नाव आरोपी म्हणून दाखल करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Badlapur School Crime: पोक्सोचा गुन्हा असूनही सहा दिवसांपासून संस्थाचालक फरार, पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी
Badlapur School Crime: राज ठाकरे बदलापूरकरांच्या भेटीला, गुन्हे दाखल झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबाची घेणार भेट!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.