Badlapur School Crime: बदलापूर प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल; आज तातडीची सुनावणी

Badlapur School girl sexually abuse: बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणाची हाय कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली जात आहे.
Badlapur Crime
Badlapur Crime
Updated on

Badlapur Case: बदलापुर प्रकरणाची मुंबई हाय कोर्टाकडून दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी कोर्टाने सुमोटो याचिका करून घेतली दाखल आहे. आज सकाळी याप्रकरणाची तातडीची सुनावणी होणार आहे. बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणाची हाय कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली जात आहे.न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

बदलापूर अत्याचारप्रकरणी झालेले आंदोलन महायुती सरकारला नीट हाताळता आले नसल्याची टीका आता होत आहे. या घटनेमुळे महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचेही समोर आले. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने २४ ऑगस्टला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.