Badlapur Case: बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट? त्याच शाळेतून एक मुलगी बेपत्ता! तिरोडकर यांची जनहित याचिका

अक्षय शिंदेनं पोलिसांकडं मीरा बोरवणकरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.
Badlapur Assault Case
Badlapur Assault CaseEsakal
Updated on

मुंबई : बदलापूरच्या खासगी शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर कथीत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याचा काल पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. यापार्श्वभूमीवर आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक मुलगी बेपत्ता झाली, असा खबळजनक आरोप आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी हे प्रकरण सीबीआयकडं देण्यात यावं अशी मागणीही केली.

Badlapur Assault Case
Akshay Shinde Encounter: तपासावर आक्षेप का? अन् कशासाठी?; शिंदे-फडणवीस-निकमांच्या विधानांवरुन अंधारेंनी उपस्थित केले सवाल

शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा गंभीर आरोपही केतन तिरोडकर यांनी आपल्या याचिकेतून केला आहे. तसंच बदलापूर घटनेचा गुन्हा नोंद झाल्याच्या दुस-याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

Badlapur Assault Case
Pune Rain: परतीच्या पावसानं पुण्यात दाणादाण! वाघोलीत धुंवाधार, पेठांमध्ये वाहनचालकांची कसरत

बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं संपूर्ण तपास तातडीनं सीबीआयकडं वर्ग करण्याची मागणी तिरोडकर यांनी केली आहे. त्यांनी याप्रकरणी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेत जनहीत याचिका दाखल केली आहे. दरम्यान, या आरोपीनं आपल्याला माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांना भेटण्याची इच्छा पोलिसांकडं व्यक्त केली होती, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Badlapur Assault Case
Badlapur School Crime: आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर झाडली गोळी?

दरम्यान, हायकोर्टानं स्थापन केलेल्या विशेष समितीपुढं जर आरोपी अक्षय शिंदे हजर झाला तर हे प्रकरण वेगळ्याच वळणार जाईल, या भीतीनं त्याचा एन्काऊंटर झाल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. तसंच ट्रस्टी आणि शाळेतून सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारी अद्याप फरार असल्याचं सांगत, ठाणे पोलीस आणि एसआयटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.