डोंबिवली - दहीहंडी उत्सव तोंडावर आला आहे. मात्र बदलापूर मध्ये दोन शाळकरी चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ बदलापूर साऊंड असोसिएशन सामाजिक बांधिलकी जपत यंदा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दहीहंडी उत्सव निमित्ताने घेतलेली कामे त्यांनी रद्द केली आहेत. त्याविषयी बॅनर बदलापूर स्टेशन परिसरात लागले आहेत.