Palghar latest News: विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजणार असल्याने लक्षात घेऊन आज बहुजन विकास आघाडी च्या कोअर कमिटी ची बैठक विरार येथे पार पडली या बैठकीत पालघर जिल्ह्यातील सहा जगाचा आढावा घेण्यात आला.
त्यामध्ये जिल्ह्यातील सहा च्या सहा जागा लढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला त्याचसोबत या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी वसई मधून निवडणूक लढवावी असा आग्रह कोअर कमिटी तील पदाधिकारी यांनी हितेंद्र ठाकूर याना केला आहे
वच पक्षनी निवडणूक कीची तयारी सुरू केली असून पालघर जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या कोअर कमिटी ची बैठक निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती आज पालघर जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला यामध्ये पालघर जिल्ह्यातील सहा जागाचा आढावा घेण्यात आला बहुजन विकास आघाडी जिल्ह्यातील सहा च्या सहा जागा स्वबळावर लढणार असल्याचे माजी महापौर नारायण मानकर यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले त्यावेळी त्यांच्या सोबत आम राजेश पाटील,जेष्ठ नेते मुकेश सावे , माजी उपमहापौर उंमेश नाईक, माजी महापौर रुपेश जाधव, अजय खोकोणी जितूभाई शहा, माजी सभापती प्रफुल साने, पंकज ठाकूर आदी उपस्थित होते
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नारायण मानकर यांनी सांगितलं की, ही पहिली सभा पालघर जिल्ह्यासाठी झाली असून या पुढील बैठका राज्यातील कोकण, सोलापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर ,ठाणे मुंबई ,मराठवाडा आदी भागांतील कोअर कमिटीतील पदाधिकारी व कार्यकर्ते शी बोलून होणार आहे दरम्यान बहुजन विकास आघाडी राज्यात जवळपास 50 विधानसभेच्या जागा लढणार आहे.
यावेळी पत्रकारांनी बहुजन विकास आघाडी चे जेष्ठ नेते व कार्याध्यक्ष राजीव पाटील यांच्या भाजप प्रवेशा बाबतीत ला प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी स्पष्ट केले की याबाबत अद्यप पक्षापर्यंत कुठलिही अधिकृतपणे माहिती आलेली नाही त्यामुळे जर तर च्या गोष्टी वर उत्तर देणे सयुक्तिक ठरणार नाही त्यानिमित्ताने या विषयावर अधिक चर्चा झाली नाही तर यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर हे यावेळी निवडणूक लढविणार नसल्याचे समोर आल्याने कोवर कमिटी तर्फे त्यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह करण्यात आला त्यावर आपण विचार करू असे आश्वासन त्यांनी कमेटीला दिले
यावेळी वसई मधून हितेंद्र ठाकूर,नालासोपारा मधून क्षितिज ठाकूर आणि बोईसर मधून राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.इतर 3 जागा साठी माजी खासदार बळीराम जाधव यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.