मुंबई - २०१६ मध्ये बजाज कंपनीने आपली लोकप्रिय 'चेतक' ही स्कुटर बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर स्कुटर प्रेमींमध्ये चांगलीच नाराजी पाहायला मिळाली होती. बजाजकडून घेतलेला निर्णय अनेक स्कुटर प्रेमींसाठी मोठा झटका होता. अशात आता बजाज एक चांगला झटका आपल्या ग्राहकांना देणार आहे. कारण तब्बल चौदा वर्षानंतर बजाजची 'चेतक' स्कुटर परत येतेय. आता लाँच होणारी 'चेतक' ही इलेक्ट्रिक स्कुटर असणार आहे.
आज मुंबईत 'बजाज चेतक'च्या इलेक्ट्रिक स्कुटरचं लॉन्चिंग झालं. या बाईकचा फर्स्ट लूक १६ ऑक्टोबररोजी अधिकृतरीत्या सर्वांसमोर आला होता. लॉन्चिंग नंतर 'चेतक'ची विक्री पुण्यातून सुरु होणार आहे. यानंतर बेगळुरु आणि त्यानंतर सर्व देशभरात कंपनी स्कुटरची विक्री सुरु करणार आहे.
किंमत किती ?
या स्कुटरच्या अधिकृत किंमत किमतीबद्दल अद्याप समोर आलेली नाही. मात्र या इलेकट्रीक स्कुटरची किंमत ९० हजार ते १.५ लाखांपर्यंत असू शकते.
बुकिंग कसं कराल ?
ही स्कुटर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने बुक करू शकतात. ऑनलाईन बुकिंगसाठी तुम्हाला https://www.chetak.com/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या जवळच्या बजाज डिलरकडे देखील 'चेतक' बुक करू शकतात
मोठी बातमी - ..'ते' करायचे हे काम; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
फीचर्स काय आहेत ?
मोठी बातमी - देवदूत नव्हे 'तो' तर जणू देवच..
१९७२ मध्ये चेतक स्कुटर भारतात लॉन्च झाली. त्यानंतर तब्बल तीन दशकं या स्कुटरचा भारतीय बाजारपेठेत बोलबाला राहिला. २००६ साली कंपनीने 'चेतक'ची निर्मिती बंद केली.आता तब्बल १४ वर्षानंतर आता बजाज पुन्हा एकदा चेतक घेऊन आलीये नव्या रंगात आणि नव्या ढंगात.
bajaj chetak scooter is relaunched in mumbai check specification and price
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.