1996

1996
Updated on

Balasaheb Thackeray: मुंबई शेतीसाठी मोफत वीजपुरवठा करण्याचा आणि मंत्र्यांचे परदेश दौरे तत्काळ थांबविण्याचा आदेश शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९६ साली युती शासनाला दिला.

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचे छायाचित्र सर्व सरकारी कार्यालयांतून आणि शिक्षण संस्थांतून लावण्यात यावे, अशी सूचना केली. गुंडांना संपविण्यासाठी पोलिस चकमकी कराव्याच लागतील, असेही त्यांनी ठाम शब्दांत सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवशाही पुन्हा विजयी करण्याचा निर्धार शिवसेनेच्या अनुयायांनी केला पाहिजे, असे ते म्हणाले. मुंबईतील फेरीवाल्यांची समस्या सोडविण्यासाठी हॉकर्स झोनची ज्या पद्धतीने आखणी होत आहे. त्याबद्दल ठाकरे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

अनधिकृत फेरीवाल्यांना यांच्या राज्यात परत पाठविण्याचा सल्ला त्यांनी महापालिका व ज्या सरकारला दिला. मुंबईतील गिरणी कामगारांचा प्रश्न 'डविण्याची आपली योजनाही त्यांनी मेळाव्यात जाहीर केली. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मुंबईतील गिरणी कामगारांचा

प्रश्न व गिरण्याची जमीन विक्री याबद्दल राज्य सरकार याच महिन्यात निर्णय घेणार असल्याचे घोषित केले. शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री या दोघांनीही युती सरकारच्या कारभारावर टीका करणान्या विरोधकांवर कठोर शब्दांत हल्ला चढविला.

1996
Dasara Melava 1994: नमाज बंद न झाल्याने रस्त्यावरील महाआरत्या पुन्हा सुरू! आठवणी बाळासाहेबांच्या; दस्तावेज 'सकाळ'चे

मेळाव्याला गर्दी कमी ?

आजच्या मेळाव्याला नेहमीसारखी गर्दी नव्हती. मात्र, "शिवसेना संपली, बाळासाहेबाच्या सभेला गर्दी होत नाही, असा प्रचार केला जातो. याचा उच्चार करून ठाकरे यांनी उपस्थितांना सवाल केला, 'शिवसेना खरोखरच संपली काय? | हटली आहे काय? यावर उपस्थितांनी 'नाही' असे उत्तर देऊन शिवसेना संपली नसल्याचे सांगितले.

श्रीकृष्ण आयोग अहवालाच्या निमित्ताने आपणावर होणाऱ्या टीकेचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, की आपणाला अटक करावी, अशी मागणी सर्व विरोधक करीत आहेत; परंतु अहवालात ठाकरे यांना अटक करावी असे वाक्य कोठेही नाही, याकडे माजी न्यायमूर्ती आर. ए. जहागीरदार यांनी लक्ष वेधले आहे. त्याची आपल्या विरोधकांनी नोंद घ्यावी. आपणाला अटक करण्याचा मूर्खपणा झाला तर सारा महाराष्ट्र पेटून उठेल. आपणाला अटक झालीच, तर आपण उपोषण वगैरे काही करणार नाही. उपोषणावर आपला मुळीच विश्वास नाही.

1996
Dasara Melava 2001: दहशतवाद रोखण्यास आणीबाणीच हवी ! आठवणी बाळासाहेबांच्या; दस्तावेज 'सकाळ'चे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.