Ulhasnagar News : उल्हासनगरात जड वाहनांना ब्रेक देण्याच्या तीन वर्षांपूर्वीच्या आदेशाला केराची टोपली

बाळासाहेब पाटील हे तीन वर्षांपूर्वी ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त असताना त्यांनी उल्हासनगरात सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्याचे अर्थातच ब्रेक देण्याचे आदेश दिले होते.
ban on heavy vehicle at ulhasnagar balasaheb patil transport
ban on heavy vehicle at ulhasnagar balasaheb patil transportSakal
Updated on

उल्हासनगर - बाळासाहेब पाटील हे तीन वर्षांपूर्वी ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त असताना त्यांनी उल्हासनगरात सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्याचे अर्थातच ब्रेक देण्याचे आदेश दिले होते.

मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे.पुरावा म्हणून उपायुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पत्र भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,माजी स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी मासमीडियावर व्हायरल केले आहे.त्यामुळे वाहतूक शाखेचे पोलीस इन एक्शन मोडमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उल्हासनगर हे व्यावसायिक शहर असून त्यात रस्ते लहान आहेत.अशात सामान उतरवण्यासाठी दिवसभर जड-अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते.त्यामुळे या वाहनांमुळे ट्रॅफिकची कोंडी होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

ही वस्तुस्थिती बघता अशा वाहनांना दुकाने,बाजारपेठा सुरू असताना प्रवेश बंदी किंबहूना ब्रेक लावण्याची मागणी राजेश वधारिया यांनी आपले सरकार या शासनाच्या ई पोर्टलवर तीन वर्षांपूर्वी केली होती.

या मागणीची दखल घेऊन ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी 15 मार्च 2021 रोजी अर्जदार राजेश वधारिया यांनी केलेल्या तकारी अर्जात नमूद केले आहे की,जड-अवजड वाहनांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत असून अपघात देखील घडत आहेत.त्यामुळे सकाळी 6 ते रात्रौ 10 या वेळेत जड-अवजड वाहनांना उल्हासनगर शहरात प्रवेश देण्यात येवू नये.

पोलीस निरीक्षक उल्हासनगर वाहतूक उपविभाग यांनी सदर तक्रारीचे अनुषंगाने जड-अवजड वाहनांचे मार्गक्रमणा बाबत निर्गमित करण्यात आलेल्या 66/18 या अधिसूचनेचे नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

सदर अधिसूचनेचे उल्लंघन करून शहरात प्रवेश करणा-या जड अवजड वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करावी. तसेच वाहतूक कोंडी होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्यात यावी.असे आदेश दिले होते.

मात्र तीन वर्षांपूर्वीच्या या आदेशाचे पालन अद्यापही करण्यात येत नसल्याने अलीकडेच या जड-अवजड वाहनांमुळे ट्रॅफिक कोंडीचे व अपघातांचे सत्र सुरू आहे.अलीकडेच खेमानी रोडवर जड वाहनांमुळे एका डॉक्टरचा व तरुणीचा बळी गेल्याचा आरोप राजेश वधारिया यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.