दिवाळी आणि छठपूजेसाठी देशभरातील लोक आपापल्या घरी जात आहेत. अनेकांनी काही महिने आधीच रेल्वेचे तिकिट आरक्षीत केले होते. तर काही लोक जनरल तिकिटावरही घरी जाण्याच्या तयारीत होते. दरम्यान, आज (27 ऑक्टोबर) पहाटे मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे ट्रेन पकडताना चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये 9 जण जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. यासह 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवासी वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेस क्रमांक 22921 ची वाट पाहत होते. ट्रेन येताच त्यामध्ये चढण्यासाठी चेंगराचेंगरी झाली.
वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही घटना घडली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, लोक ट्रेनमध्ये चढण्यासाठी धक्काबुक्की करू लागले.