मुंबई: राज्यातील टोल वाढविण्यासंदर्भातील 2014 च्या धोरणानुसार प्रत्येक टोल प्लाझाच्या नोटिफिकेशन पासून तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना टोलमध्ये वाढ द्यायची असते. त्याप्रमाणे राजीव गांधी सागरी सेतूला तीन वर्षे पूर्ण झाल्याने प्रत्येकी 6 टक्क्यानं एकूण तीन वर्षांची वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना 1 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून वाढीव दरात सी-लिंक टोल भरावा लागणार आहे.
यामध्ये कार आणि लहान वाहनांसाठी 85 रुपये, मिनीबस सदृश वाहनांसाठी 130 रुपये आणि बस-ट्रकचालकांना सी लिंकचा वापर करण्यासाठी 175 रुपये मोजावे लागणार आहे. तर यामध्ये डेली पास, मासिक पासच्या दरात सुद्धा बदल करण्यात आला आहे. शिवाय मासिक आणि डेलीच्या पासमध्ये सवलत योजना सुद्धा लागू करण्यात आली आहे. मुंबईकरांना येथून सुमारे 31 वर्ष नियमित टोल भरावा लागणार असून, दर तीन वर्षाने टोल दरात वाढ होणार आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
टोल वाढीचे धोरण 2014 नुसार दर तीन वर्षाने टोलमध्ये वाढ केल्या जाते. त्यामध्ये दरवर्षी 6 टक्के प्रमाणे एकूण तीन वर्षांची वाढ दिल्या जाते. त्याप्रमाणे राजीव गांधी सागरी सेतूला तीन वर्षे पूर्ण झाल्याने यावर्षी वाढ करण्यात आली आहे.
कमलाकर फड, मुख्य महाव्यवस्थापक, टोल विभाग एमएसआरडीसी
वाहन प्रकार | एकेरी फेरी | दुहेरी फेरी | डेली पास | मासिक पास |
कार | 85 | 157.5 | 212.5 | 4250 |
मिनी बस | 130 | 195 | 325 | 6500 |
बस/ट्रक | 175 | 262.5 | 437.5 | 8750 |
-----------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Bandra Worli Sea Link toll rates increase Check out new rates
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.