बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी बॅंकेची व ग्राहकांची तब्बल साडे 3 करोडला फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
डोंबिवली - बॅंकेत ग्राहकांनी ठेवलेल्या बचत ठेवीवर ओव्हर ड्राफ्ट फॅसिलीटी घेत रकमा काढून, धनादेशवर खोट्या सह्या करीत खात्यातून रक्कम वळती करत बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी बॅंकेची व ग्राहकांची तब्बल साडे 3 करोडला फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवली पूर्वेतील आयसीआयसीआय बॅंकेत ही फसवणूकीची घटना घडली असून बॅंकेचे क्षेत्रीय प्रमुख पवन माळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर आशिष याख्मी व त्याच्या इतर साथीदारांवर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वेत आयसीआयसीआय बॅंकेची एमआयडीसी शाखा आहे. या बॅंकेत रिलेशनशीप मॅनेजर म्हणून काम करणारे आशिष याख्मी व त्याच्या साथीदारांनी ग्राहकांच्या परवानगीशिवाय ग्राहकांच्या खात्यात असलेल्या एफडीच्या अगेस्ट ओव्हर ड्राफ्ट फॅसिलिटी घेवून रक्कम काढणे, ग्राहकांनी गुंतवणूकीसाठी दिलेल्या धनादेश वर खाडाखोड करुन खोट्या सह्या करुन पैसे काढणे, ग्राहकांची प्रॉडेन्शुअलची पॉलीसी काढत बॅंकेची तसेच ग्राहकांची चक्क 3 करोड 57 लाखाला फसवणूक केल्याची घटना घडली आहे. रकमेचा अपहार करण्यासाठी आशिषने त्याचे वडिल व मित्राचे खाते वापरले. 2019 ते 2021 या दरम्यान ही फेरफार करीत बॅंकेची व ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलिस निरिक्षक अनिल पडवळ करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.