Mumbai: तो येतोय! घराणेशाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी; नवी मुंबईत लागले बॅनर, कोणाला आव्हान?

Navi Mumbai Airoli constituency election: राज्यात सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. त्याची झलक मतदारसंघांमध्ये पाहायला मिळू लागली आहे. ऐरोलीमध्ये दिसणारे बॅनर हे त्याचेच उदाहरण आहे.
Banners
Banners
Updated on

Mumbai: तो येतोय.. अशा आशयाचे बॅनर सध्या नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये झळकलेत. हे बॅनर नवी मुंबईकराचं लक्ष वेधून घेतायेत. तो येतोय घराणेशाहीला सर्व सामांन्यांची ताकद दाखवायला. तो येतोय माथाडी कामगारांचा आवाज बुलंद करायला, तो येतोय नवी मुंबईकरांना टोल पासून मुक्ती द्यायला. अशा आशयाचे बॅनर हे नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहेत.

या बॅनरच्या माध्यमातून भाजप आमदार गणेश नाईक यांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचं बोललं जात आहे. तसंच हे बॅनर कोणी झळकवले हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी नाईकांना या माध्यमातून कुणीतरी आव्हान देत विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. या बॅनरच्या माध्यमातून हेच स्पष्ट होत आहे.

Banners
Swara Bhaskar चे पती विधानसभा निवडणूक लढवणार? मुंबईतील 'या' मतदारसंघातून उमेदवारी मिळणार

हे बॅनर कोणी लावले हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी येत्या काळात हे बॅनर कोणी लावले हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, राज्यात सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. त्याची झलक मतदारसंघांमध्ये पाहायला मिळू लागली आहे. ऐरोलीमध्ये दिसणारे बॅनर हे त्याचेच उदाहरण आहे.

Banners
Voting Registration: विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अद्यापही सुरु; मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलं 'हे' महत्वाचं आवाहन

राज्यात दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. तसेच सूतोवाच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये केले आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळणार आहेत. युती आणि आघाडीमध्ये प्रत्येकी तीन प्रमुख पक्ष असल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या देखील जास्त आहेत. अशा स्थितीत पक्षाच्या प्रमुखांना जागा वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.