हात दिला की खांद्यावर बसायचं ! पनवेलमध्ये बारचालक आता काय करतायत वाचा...

हात दिला की खांद्यावर बसायचं ! पनवेलमध्ये बारचालक आता काय करतायत वाचा...
Updated on

पनवेल : उत्पादन शुल्क विभागाने सायंकाळी 6 पर्यंत मद्यविक्री करण्याच्या दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करण्याचे काम बारचालकांकडून केले जात आहे. अन्नपदार्थ पार्सल देण्याच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या बारमधून सर्रास मद्य विक्री केली जात असून, पार्सलच्या नावाखाली सुरू असलेल्या या धंद्याकडे उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये देशभरात मद्य विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तर खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या रेस्टोरंटना खाद्य पदार्थ पार्सल देण्याचा परवाना देताना रेस्टॉरंटसोबत असलेल्या बारमधून मद्य विक्री बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

मद्य विक्री बंद झाल्याने या कालावधीत मद्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात आल्याने काही कालावधीनंतर मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मद्य विक्री करण्याची परवानगी देण्यात आली होती, तर खाद्य पदार्थ विक्री करण्याची परवानगी असलेल्या रेस्टोरंटमधील बारमधूनही सायंकाळी 6 पर्यंत मद्य विक्री करण्याची परवानगी देण्यात आलेली असताना खाद्य पदार्थ पार्सल देण्याच्या रात्री उशिरापर्यंत असलेल्या परवानगीचा फायदा उचलत बार अँड रेस्टोरंट चालवणारे हॉटेलचालक जादा दराने रात्री उशिरापर्यंत मद्य विक्री करत असल्याने लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या अशा चालकांविरोधात कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

पनवेल परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे पालिका हद्दीत सम-विषम तारखेनुसार सायंकाळी 8 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या हॉटेलकरिता हा निर्णय लागू नसल्याने पालिकेच्या या निर्णयाकडे डोळे ्झाक करत रात्री उशिरापर्यंत खाद्य पदार्थ विक्री तसेच मद्य विक्री करण्याचे काम बारचालक करत आहेत.

बारचालकांना केवळ सायंकाळी 6 पर्यंत मद्य विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या बारचालकांविरोधात कारवाई केली जाऊ शकते, असं उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अविनाश रणपिसे यांनी म्हटलंय.

bar owners in panvel are not following governments guideline for the sale 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.