मुंबई: अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे एक मोठा बार्ज आज सकाळी भरकटला. तो बार्ज मुंबई हायमधील हिरा तेल उत्खनन विहिरींच्या दिशेने भरकटत चालल्याने मुंबईतून दोन युद्धनौका तेथे निघाल्या. या बार्जवर 273 खलाशी व कर्मचारी आहेत. तांत्रिक बिघाडामुळे अनियंत्रित झालेला हा बार्ज तेल विहिरींवर धडकल्यास दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे ही बाब संवेदनशील असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत नौदलाच्या दोन बोटी बार्जची सुटका करण्यासाठी समुद्रात आहेत. (Barge boat with 273 sailors out of control in sea INS Kochi INS Talwar on Field for rescue)
२७३ खलाशी असलेल्या बार्जमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी किंवा त्याला सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बार्ज योग्य दिशेने जात असताना तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे आता बार्ज अनियंत्रित झालं आहे. नौदलाची कोची ही युद्धनौका दुपारी एक वाजताच्या सुमारास मुंबईच्या नौदल गोदीतून रवाना झाली. समुद्र खवळलेला असताना आणि वादळी वारे वाहत असताना INS तलवार ही दुसरी युद्धनौकाही थोड्या वेळात मुंबईतून निघणार आहे. पहिली युद्धनौका दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या बार्जजवळ जाईल. त्यानंतर परिस्थितिनुसार हा बार्ज सुरक्षित किनार्यावर आणला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.