Barsu Refineray: उद्योगमंत्री सामंत अन् शरद पवार भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा, जाणून घ्या

बारसू इथल्या रिफायनरीविरोधात आंदोलक आक्रमक झाल्यानं राज्यातील राजकारण तापलं आहे.
Uday samant Meet sharad pawar amide Ratnagiri Barsu Refinery Protest Maharashtra Politics
Uday samant Meet sharad pawar amide Ratnagiri Barsu Refinery Protest Maharashtra Politics
Updated on

मुंबई : बारसू इथल्या रिफायनरीविरोधात आंदोलक आक्रमक झाल्यानं राज्यातील राजकारण तापलं आहे. या आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी नुकतीच राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील आज शरद पवार यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा केली. या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील त्यांनी माध्यमांशी बोलताना शेअर केला. (Barsu Refineray Uday Samant met Sharad Pawar these issues were discussed)

Uday samant Meet sharad pawar amide Ratnagiri Barsu Refinery Protest Maharashtra Politics
Amit Thackeray: "आपण लवकरच सत्तेत असू"; अमित ठाकरेंनी मनसेच्या कामगार मेळाव्यात व्यक्त केला विश्वास

सावंत म्हणाले, बारसूमधील जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या प्रमुख मंडळींनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मी आज दुपारी साडेतीन वाजता शरद पवार यांना त्यांच्या घरी भेटण्याचं ठरवलं होतं, या बैठकीत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे देखील होते.

Uday samant Meet sharad pawar amide Ratnagiri Barsu Refinery Protest Maharashtra Politics
Nana Patole: राज्याचे मुख्यमंत्री रुसून बसतात, उपमुख्यमंत्री परदेशात जातात, पण...; पटोलेंचा गंभीर इशारा

सावंत-पवार भेटीत 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

1) आंदोलनकर्त्यांची शंका आणि गैरसमज दूर झाल्याशिवाय प्रकल्प पुढे रेटला जाणार नाही.

2) कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही स्तरावर आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांशी आणि शेतकऱ्यांनी बोलायला शासन तयार आहे.

3) सध्या केवळ माती परीक्षण सुरु आहे ते झाल्यानंतर कंपनी इथं प्रकल्प करायचा की नाही हे ठरवणार आहे.

4) बारसूतील आंदोलनानंतर चर्चेला सुरुवात झालेली आहे. शरद पवारांनी स्वतः यामध्ये पुढाकार घेतला आहे. जे चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. ज्यांच्याकाळात अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आले आहेत.

5) रत्नागिरीत काल बारसू प्रकल्पाबाबत बैठक झाली यामध्ये उद्धव ठाकरे, विनायक राऊत उपस्थित होते. त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की, जर तुम्ही त्यांची समजूत काढली तर आम्ही देखील सोबत आहोत.

6) बारसूच्या मुद्द्यावरच ही भेट झाली, यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. यावेळी बारसूतील गैरसमज कसे दूर केले जातील यावरच चर्चा झाली, सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही.

अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()