मुरबाड : बारवी प्रकल्पग्रस्त 209 तरुणांना नोकरीच्या ऑर्डर 1 ऑक्टोबरपर्यंत मिळणार असल्याचे जाहीर झाले होते; मात्र अद्याप महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) एकाही तरुणाला नियुक्ती पत्र न मिळाल्याने नोकरी कधी मिळणार, असा प्रश्न प्रकल्पग्रस्त विचारत आहेत.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी मंत्रालयात पाच उमेदवारांना नोकरीचा आदेश देण्यात येईल आणि 1 ऑक्टोबरपर्यंत सर्व 209 उमेदवारांना ऑर्डर देऊन एमआयडीसीतर्फे नोकरीत सामावून घेण्यात येईल,
अशी जाहीर घोषणा आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड येथे आयोजित मेळाव्यात एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली होती. मेळाव्यात या तरुणांची नावे व नोकरीची पदेसुद्धा जाहीर केली होती; मात्र 29 सप्टेंबरला उद्योगमंत्री सुभाष देसाई हे मुंबईबाहेर दौऱ्यावर असल्याने तो कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नोकरीची नियुक्ती पत्रे कधी देण्यात येतील, हे अद्यापही जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे नोकऱ्यांची नियुक्ती पत्रे कोणत्या शीतपेटीत बंद केली आहेत व ती तरुणांना कधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिकाऱ्यांनी नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यासाठी उद्योग मंत्र्यांच्या भेटीची वेळ अगोदर निश्चित केली नाही. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला. येत्या पंधरा दिवसांत नोकरीचे नियुक्ती पत्रे देण्यात येतील, अशी माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली.- कमलाकर भोईर, अध्यक्ष, बारवी प्रकल्पपीडित संघटना
Barvi project victims do not have a letter of appointment from MIDC
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.