बीसीजी लस कोरोनावर प्रभावी? केईएममध्ये ट्रायल पूर्ण

Corona Vaccination
Corona VaccinationSakal media
Updated on

मुंबई : पालिकेच्या केईएम रुग्णालयात बीसीजी लसीची (BCG Vaccine) क्लिनिकल ट्रायल पार पडली. आता या ट्रायलची प्रक्रिया अंतिम (Final trail Of Vaccine) टप्प्यात असून आतापर्यंत 60 ते 75 वयोगटातील जवळपास 112 ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात आली आहे. दरम्यान, बीसीजी लस कोरोनावर प्रभावशाली (impact On Corona) ठरु शकते. शिवाय, ज्या ज्येष्ठ नागरिकांना ही लस दिली गेली आहे त्यांना गेल्या 6 महिन्यांत कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम आढळले नसल्याचे निरीक्षण केईएम रुग्णालयाच्या (KEM Hospital) तज्ज्ञांनी मांडले आहे. (BCG Vaccine more Impact On Corona says KEM Hospital Authorities)

केईएम रुग्णालयातील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीसीजी लसीसाठी भारतभरातून 1555 जणांना बीसीजी आणि  778 जणांना नियंत्रण ग्रुप मध्ये सामील करण्याचे ठरले. म्हणजेच, 778 जणांना निवड बीसीजी लस दिली गेली नाही. दरम्यान, आता या सर्व नागरिकांचा अहवाल आयसीएमआरला पाठवला गेला आहे. सर्व ठिकांणाचा अहवाल एकत्र करुन आता याबाबतचा निष्कर्ष काढला जाईल. मात्र, केईएम रुग्णालयाच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही लस कोरोनासाठी प्रभावशाली ठरु शकते.

Corona Vaccination
संकटात संधी : भटक्या कुत्र्यांचा सांभाळ करण्यासाठी 'तिने' सुरु केला केकचा व्यवसाय

11 ठिकांणाची निवड

चेन्नई, दिल्ली, भोपाळ,अहमदाबाद,मुंबई, जोधपूर येथे हे संशोधन सुरू झाले. नंतर म्हैसूर, कोची,बंगळुरू येथील केंद्रे मिळून 11 ठिकाणांहून बीसीजीसाठी ज्येष्ठ व्यक्तींचे नोंदणीकरण करण्यात आले.

काय आहे बीसीजी?

बीसीजी ही लस टीबीसाठी बनवण्यात आली असली तरी ती श्वसनमार्गाने पसरणाऱ्या इतर अजारांविरुद्धही काम करते. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात ही लस नवजात बालकांना देण्यात येते. ती अतिशय सुरक्षित असून बालमृत्यू दर कमी करण्यास उपयुक्त ठरते. ही लस ज्येष्ठ नागरिकांना कितपत संरक्षण देवू शकते हे या संशोधनातून कळेल. बीसीजी लस ही तसेच मोनोसायटीस व एनके पेशींच्या माध्यमातून काम करतात. लस घेतलेल्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती त्यामुळे अधिक कार्यक्षम होते व संसर्गाविरुद्ध परिणामकारक लढा देते. उच्च रक्तदाब, मधुमेह अशा सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ती खूप उपयुक्त ठरू शकते.

हाॅटस्पाॅट परिसरातून नागरिकांची निवड

मुंबईतील विशेषतः एफ साऊथ,  जी साऊथ या हाॅटस्पाॅट ठरलेल्या विभागात पोस्टर्स लावून व घरोघरी जावून ज्येष्ठ नागरिकांना या संशोधनाबद्दल माहिती दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले.

ज्या ज्येष्ठ व्यक्तींनी संमती दिली त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांचा आधी स्वॅब घेण्यात आला व रक्त चाचणी करण्यात आली. छातीचा एक्सरे काढण्यात आला. या चाचण्यांचे अहवाल तपासून ते निगेटिव्ह आल्यानंतर बीसीजी लस देण्यात आली. त्यानंतर पहिले दोन महिने दर आठवड्याला फोन करून आणि तीन महिन्यांनी प्रत्यक्ष भेटून, स्वॅब आणि रक्तचाचणी करण्यात आली. पाचव्या महिन्यात पुन्हा फोनवर तर सहा महिन्यांनी स्वाब रक्तचाचणी व एक्स-रे करण्यात आला. सर्व सहभागी व्यक्तींचा सहा महिने पाठपुरावा करण्यात आला. दरम्यान, येत्या एक किंवा दोन महिन्यांत या संशोधनाचे निष्कर्ष उपलब्ध होतील. केईएम रुग्णालयातील सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे या संशोधनात सहकार्य लाभले आहे.

Corona Vaccination
चोरीचा माल कसा परत करायचा ते राऊतांकडून शिकावं - किरीट सोमय्या

60 ते 75 या ज्येष्ठ नागरिकांच्या लसीसाठीचे हे पहिलेच क्लिनिकल ट्रायल केले गेले. हे क्लिनिकल ट्रायल पाठपुराव्यासाह पूर्ण झाले आहे. सहा महिने चाललेल्या या ट्रायलचा अहवाल आयसीएमआरकडे आहे. मात्र, आतापर्यंतच्या निरीक्षणावरुन ही लस कोरोनावरही प्रभावी ठरु शकते. गंभीर कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. बीसीजीला 100 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. विशेषतः स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम ही लस करते.

- डॉ. ऋजुता हाडये, प्राध्यापक, जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग, केईएम रुग्णालय

कोरोनाची लागण बालक आणि वयोवृद्ध व्यक्तींना होते. तर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचेच होत असल्याचे समोर आले आहे. बीसीजी लस लहान बालकांचे क्षयरोगापासून रक्षण करते, तर कोरोना विषाणू विरोधात ही लस प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना संकटसमयी बीसीजी लस वृद्धांसाठी उपयुक्त ठरत असल्याने ही लस देण्यात आली आहे. ही लस दिल्यामुळे कोरोनाची शक्यता, गांभीर्य आणि मृत्यूदर कमी करता येत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.