आज नुसता नारळ फोडलेला नसून कामही सुरू झालंय; आदित्य ठाकरेंचा फडणवीस सरकारला टोला
मुंबई: शहरातील भव्य दिव्य अशा बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्यातील महत्त्वाचे मंत्री हजर होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. हा क्षण केवळ मुंबईसाठीच नव्हे तर देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे असे ते म्हणाले. (BDD Chawl Redevelopment Aaditya Thackeray says its important moment for not only Mumbaikars but for whole India vjb 91)
"हा क्षण मुंबईसाठी नाही तर देशासाठी महत्वाचा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये नवी दिशा दाखवण्याचं काम सुरू आहे. अडखळलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे काम आता हाती घेतले आहेत. बीडीडीच्या सर्व प्रकल्पाचा विकास होत असताना ३ वर्ष नारळ फुटुनही काही काम होतं नव्हतं. उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन बैठका घेऊन कोरोना काळात हा प्रोजेक्ट किती महत्वाचा आहे, त्याचं महत्व पटवून दिलं. आजचा नारळ नुसता फोडलेला नसून त्याबरोबरच काम सुरू केलेलं आहे.", असे आदित्य ठाकरे म्हणाले.
"प्रत्येक महिन्याला या ठिकाणी मी आणि मंत्री आव्हाड हे दोघे भेट देऊन कामाची पाहणी करणार आहोत. यातील नागरिकांची पहिल्यांदा स्थलांतर ट्रांजिट कॅम्पमध्ये व्यवस्था करायला हवी आहे. तिकडेही सुसज्ज इमारत आहे. नागरिकांना सॅम्पल फ्लॅटही तयार आहेत. त्यांच्या स्वप्नातलं घर कसं असणार हेदेखील त्यांना पाहता येणार आहे. कारण नुसती घर बांधून चालणार नाही, तर इतरही उपाययोजना देणं महत्वाच्या आहेत", असं ते म्हणाले.
वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींचा भूमिपूजन सोहळा २२ एप्रिल २०१७ रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील जांबोरी मैदानात झाला होता. या प्रकल्पासाठी सरकारने नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नेमणूक केली. या प्रकल्पासाठी म्हाडाने बांधकामासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली असून प्रकल्पाचे काम सुरू करण्यास महाविकास आघाडीतील नेत्यांना वेळ मिळाला नव्हता. अखेर 27 जुलैला वरळी पुनर्विकासाच्या बांधकामाच्या इमारतीचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला. या दरम्यान पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ पुढे ढकलण्यात आला. आज अखेर याला मुहर्त लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.