BDD प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच सगळ्यांची इच्छा!

BDD प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच सगळ्यांची इच्छा! गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं मत BDD Chawl Redevelopment Minister Jitendra Awhad wish to complete this project as early as possible vjb 91
Jitendra Awhad
Jitendra Awhad
Updated on

मुंबई: बहुचर्चित अशा बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाचा आज भूमिपूजन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यातील इतर महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. "आमच्यापुढे खूप प्रश्न होते. ते प्रश्न सोडवत आम्ही पुढे आलो. जे विरोधात होते त्यांनी आमची साथ सोडली. पण आता हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, हीच आमची इच्छा आहे", असे म्हणत या प्रकल्पाकडे ते स्वत: जातीने लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (BDD Chawl Redevelopment Minister Jitendra Awhad wish to complete this project as early as possible vjb 91)

Jitendra Awhad
'केवळ मुंबईसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण'

"बीडीडचा हा प्रकल्प होण्यासाठी जास्त मोकळीक आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आज कोरोनाचं संकट नसतं, तर अख्खी बीडीडी आपल्याला या ठिकाणी पहायला मिळाली असती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील ८ हुतात्मे, साहित्यिक हे याच चाळीतून पुढे आले. ही पृथ्वी कष्टकऱ्यांच्या हातावर उभी आहे", असे ते म्हणाले.

Jitendra Awhad
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

"मुंबई कशी बदलली? हे आपल्याला मागील अनेक वर्षात पहायला मिळालं आहे. दादर सोडलं की हाजीअलीपर्यंत अनेक भोंगे, व्यापारी आणि बदललेली मुंबई दिसते. जांबोरीत उभे राहून आजूबाजूला नजर टाकलीत तर श्रीमंतांचे इमले दिसतील. मीही पूर्वी चाळीत राहत होतो. कालांतराने १७ हजारांना खोली विकून ठाणे गाठलं, पण शनिवार रविवारी चाळीत यायचो. आता मात्र इथे जाणं येणं कमी झालं. चाळीचं दुखणं काय असतं ते माताभगिनींना कळतं. हे सर्व त्यांच्या आता डोळ्यासमोरून जात असेल", असेही त्यांनी सांगितले.

Jitendra Awhad
फडणवीसांचं CM उद्धव ठाकरेंना पत्र, केल्या या 26 मागण्या

"हे काम ३६ महिन्यात पूर्ण होईल का? असं मला शरद पवार यांनी विचारले. मी आता ग्वाही दिली आहे. हा प्रकल्प कोण करणार यावरून वाद होता. आठवड्यातून तीन वेळा बैठका होत होत्या. आधीच्यांनी मनापासून ७ वर्ष रखडलेल्या या बीडीडीकडे लक्ष दिलं असं वाटत नाही. पण आता मालकी हक्काचा करारनामा चाळीत वाटला जाईल. नागरिकांची स्वाक्षरी करून तो त्यांना आणि आम्हालाही दिला जाईल. पोलिसांचे प्रश्न घेऊन काही महिला आल्या होत्या. त्यांनी सांगितलेल्या घटनांनी आमचे डोळे उघडले. त्यावरून पोलिसांनाही हक्काची घरं देण्याचं ठरलं आहे", अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.