रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या 'या' गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, तज्ज्ञांचे आवाहन

homeopathy
homeopathy
Updated on

कल्याण : कोरोना आजारावर अद्याप लस  सापडली नसून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा पर्याय म्हणून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाची शिफारस केली आहे. औषधाच्या मागणीमुळे आगामी दिवसात आर्सेनिकचा तुटवडा निर्माण होऊन बोगस औषधही विकली जाऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी जवळच्या डॉक्टरांकडून खातरजमा करूनच औषधाचे सेवन करावे असे होमिओपॅथीक डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. 

अर्सेनिक औषध रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम असून साथीच्या आजाराला आळा घालण्यास उपयुक्त आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी अर्सेनिक हे प्रतिबंधात्मक घटक म्हणून चांगला पर्याय आहे. तसेच श्वसनाच्या आजारांवरही अर्सेनिक उपयुक्त असल्याचे जाणकार सांगतात. सर्व वयोगटातील व्यक्ती हे औषध घेऊ शकतात. मात्र ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह व इतर आजार असल्यास अशा नागरिकांनी खबरदारी म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे असेही तज्ञ आवर्जून सांगत आहे.

हे औषध उपाशी पोटी घ्यायचे असून औषध घेतल्यावर किमान अर्धा तास कोणत्याही पदार्थाचे सेवन टाळले पाहिजे. इतकेच नाही तर औषध घेतल्यावर बराच काळ चहा, कॉफीही घेणे टाळले पाहिजे. अनेक लोकप्रतिनिधीकडून अर्सेनिक औषधाचे मोफत वाटप करण्याचे आयोजन केले गेले आहे. मात्र यावेळी औषध घेताना ते कसे घ्यावे? लहान मूलांना कसे द्यावे? कोणती पथ्य पाळावीत याचे मार्गदर्शनच नागरीकांना मिळाले नाही तर औषधांचे सेवन करुन त्याचा काहीही उपयोग होणार नाही असेही होमीओपॅथीक डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. 

या औषधाचा अगोदरही चांगला परिणाम दिसून आला आहे. औषधाचे सेवन केलेल्या व्यक्तींच्या  रोगप्रतिकारशक्तीतही उत्तम सुधारणा झाली आहे. मात्र मधुमेह व इतर आजार असलेल्यानी खबरदारी म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 
- उमेश पाटील, होमिओपॅथीक डॉक्टर, दिवा 

अर्सेनिस या औषधाचा योग्यरीत्या परिणाम होण्यासाठी काही पथ्य पाळावी लागतात. यासाठी होमिओपॅथीक डॉक्टरांनाही सोबत घेणे आवश्यक आहे. अनेक नागरिक या औषधाबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यामुळे त्यांचेही शंकानिरसन होणे गरजेचे आहे
- योगेश खंबायत, होमिओपॅथीक डॉक्टर, डोंबिवली.

Be sure to consult a doctor before taking pills that boost the immune system, experts appeal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.