Thane News : दिव्यातील बेडेकर वासीय पाण्यासाठी काढणार पालिकेवर तिरडी मोर्चा !

Thane News : उद्या 9 ऑक्टोबरला दिवा प्रभाग समितीवर सर्व बेडेकर नगर येथील नागरिकांकडून तिरडी घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे.
Bedekar Nagar Water Crisis
Thane Newssakal
Updated on

आरती परब

दिवा: बेडेकर नगर वासियांना गेले अनेक महिने भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नावर दिवा प्रभाग समितीकडे अनेक वेळा पाठपुरावा करुनही महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचे ठोस काम करण्यात न आल्याने महापालिकेच्या मुजोर आणि कामचुकार अधिकाऱ्यांना झोपेतून जागे करण्यासाठी उद्या 9 ऑक्टोबरला दिवा प्रभाग समितीवर सर्व बेडेकर नगर येथील नागरिकांकडून तिरडी घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे.

बेडेकर नगर वासियांना होत नसलेल्या पाणी पुरवठ्याबाबत 31 जुलै आणि 24 सप्टेंबर अशा 2 वेळा पालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. पण त्या पत्रव्यवहाराची दखल घेऊन नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मागणी पालिका अधिकारी पूर्ण करु शकले नाहीत.

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजांपैकी एक पाणी असून ते ही वेळेत रोजच्या रोज तेथील नागरिकांनी मिळत नाही. तर दिव्यात टॅंकरचे विकतचे पाणी लगेच मिळते पण तेच पाणी आमच्या पाण्याच्या लाईनला येतच नाही. आम्ही हे असे किती दिवस विकतच पाणी घेऊन दिवस काढायचे असा, प्रश्न नागरिकांकडून येत आहे.

Bedekar Nagar Water Crisis
Thane: ‘धर्मवीर’ की ‘स्वराज्यरक्षक’? छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक वादात!

दिवा प्रभाग समितीचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता साळुंखे आणि उप अभियंता वाघिरे यांच्याकडे बेडेकर नगर वासियांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने या तिरडी मोर्चाचा मार्ग निवडण्यात आला आहे. सदर मोर्चाच्या वेळी कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिल्यास याला सर्वस्वी ठाणे महानगर पालिका जबाबदार असेल, असे नागरिकांनी सकाळला माहिती दिली.

अंकीता कदम, नागरिक - जिवंत माणसांना समस्या, अडचणी या समजतात पण मेलेल्या माणसांना त्या समजत नाही. तर या अशा मुर्दाड पालिका अधिकाऱ्यांच्या नावाने उद्या आम्ही बेडेकर नगर वासिय तिरडी मोर्चा घेऊन पालिकेवर जाऊन निषेध करणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.