मध्य रेल्वे मार्गावर भिकारी आणि विक्रेत्यांचा सुळसुळाट; सरसकट प्रवाशांना मात्र प्रवासाची परवानगी नाही

मध्य रेल्वे मार्गावर भिकारी आणि विक्रेत्यांचा सुळसुळाट; सरसकट प्रवाशांना मात्र प्रवासाची परवानगी नाही
Updated on

मुंबई : कोरोनाच्या माहामारीमूळे अद्यापही उपनगरीय मार्गावर लोकल प्रवासाची परवानगी नसून सध्या फक्त नियोजीत वेळेत सरसकट महिला आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलच्या डब्यांमध्ये भिकारी आणि विक्रेत्यांचा सुळसुळाट दिसून येत असल्याने रेल्वे मार्गावरील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सरसकट महिलांनाच रेल्वे मंत्रालयाने प्रवासाची परवानगी दिली आहे. त्यासाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलीसांना (जीआरपी) रेल्वे स्थानकांवर तैणात करण्यात आले आहे. परवानगी असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकांवर सोडायचे आहे. मात्र, परवानगी नसलेल्या प्रवाशांचाही सध्या सर्रास प्रवास दिसून येत आहे. त्यामध्येच भिकारी आणि विक्रेते सुद्धा दिसून येत आहे.

नुकतेच मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर महिलांसोबत विनयभंगाच्या घटना घडल्या आहे. त्यातील आरोपी सुद्धा सामान्य प्रवासी असल्याने त्यांच्या रेल्वे स्थानकांवरील आणि डब्यातील प्रवासावर प्रश्न उपस्थित केले जात असतांना, भिकारी आणि विकेत्यांच्या सर्रास प्रवासामूळे पुन्हा एकदा रेल्वे मार्गावरील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मास्क घालण्याच्या नियमांचा भंग

रेल्वे डब्यामध्ये प्रवास करतांना, प्रवाशांनी थुंकू नये, मास्क वापरावे कोविड - 19 च्या नियमांचे पालन करावे अशा उद्घोषणा केल्या जातात. मात्र, डब्यांमध्ये सर्रास भिकारी आणि विविध खाद्य पदार्थ आणि साहित्यांच्या विक्रेते विनामास्क फिरत असल्याचे दिसून येत आहे.

मध्य रेल्वे मार्गावर लवकरच रेल्वे सुरक्षा बल प्रवाशांची तपासणी अभियान सुरू करणार आहे. त्यामूळे अवैध आणि गैरमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे, असं  मध्य रेल्वे मुंबई विभाग आयुक्त के. के. अशरफ म्हणालेत. 

रेल्वे मार्गावरील अपुरे सुरक्षा कर्मचारी आणि अपुर्ण तपासणी व्यवस्था असल्याने लोकल डब्यामध्ये आता भिकारी, फेरीवाले आणि तृतीयपंथी दिसून येत आहे. सामान्य प्रवाशांना मात्र, लोकल प्रवासापासून वंचित ठेवले आहे. त्यामूळे अशा प्रवाशांना थांबवने आवश्यक आहे. त्यासोबतच महिलांची सुरक्षा आणि सर्व रेल्वे स्थानकांवर अत्याधीक सुरक्षा आणि तपासणी व्यवस्था उभारण्यासाठी होमगार्ड आणि सामाजीक सेवकांची मदत घेणेही गरजेचे आहे, असं रेल यात्री परिषद अध्यक्ष सुभाष गुप्ता म्हणालेत.

सर्वसामान्य लोकांकरीता लोकल प्रवास बंद आहे, यात चाकरमानी भरडला जातोय. मात्र सध्या लोकलमध्ये गर्दुल्ले व भिकारी निर्धास्तपणे वावरतायत. यावर रेल्वे सुरक्षा यंत्रणेचा फोलपणा समोर येतो आहे. सरकारी यंत्रणा जे इमाने इतबारे नियमित कर भातुन, तिकिटे आणि पासेस काढून वापरतायत त्यांना मानसिक, शारिरीक त्रास देण्याची अरेरावी राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन करतेय, असं श्याम उबाळे ( सरचिटणीस, कल्याण कर्जत कसारा रेल्वे प्रवासी संघटना) म्हणालेत.

beggars and vendors on the central railway trains but all passengers are not allowed to travel

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.