मुंबई, 22 : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या ताफ्यात बेल्जियम मेलिनोइस प्रजातीचे दोन श्वान लवकरच दाखल होणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हे श्वान दाखल होऊ शकले नाही. मात्र अनलॉक काळात रेल्वेच्या श्वान पथकात दोन बेल्जियम मेलिनोइस प्रजातीचे श्वान आरपीएफ तैनात केले जातील. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेला नवीन कलाटणी मिळणार आहे.
बेल्जियम मेलिनोइस प्रजातीच्या श्वानांचा वापर भारतीय सैन्य, सीआरपीएफ, आईटीबीपी आणि बीएसएफ यामध्ये केला जातो. बेल्जियम मेलिनोइस प्रजातीच्या श्वानांनी अतिरेकी ओसामा बिन लादेन याच्या पाकिस्तानमधील एबटाबाद येथील गुप्त जागेचा शोध लावण्यास अमेरिकेच्या सैनिकांनी मदत केली. त्यामुळे या श्वानांना मध्य रेल्वेच्या आरपीएफमध्ये दाखल केले जाणार आहे.
सध्या हैद्राबाद, चेन्नई येथील रेल्वे सुरक्षा बलामध्ये बेल्जियम मेलिनोइस श्वान आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई विभागात या प्रजातीचे श्वान खरेदी करण्यात येत आहेत. मात्र लॉकडाऊन लागल्याने या श्वानांची खरेदी रखडली. परंतु, अनलॉकमध्ये या श्वानांना भरती करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आरपीएफ अधिकारी आणि सुरक्षा विभागांची यावर चर्चा सुरु आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ आरपीएफ अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा। Marathi News From Mumbai
बेल्जियम मेलिनोइसची वैशिष्ट्ये
( संपादन - सुमित बागुल )
belgian malinois dogs to join railway police forces to make rail security more stronger
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.