वर्षभरापूर्वी अ‍ॅम्ब्युलन्सचे भोंगे वाजायचे आता इतर भोंगे वाजतायत - मुख्यमंत्री

बीएमसीचे आयुक्त चहल लिखीत 'कोविड वॉरियर' पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray e sakal
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज बीएमसीचे आयुक्त चलह यांनी लिहिलेल्या 'कोविड वॉरियर' या पुस्तकाचं प्रकाश पार पडलं. यावेळी आपण कोरोनाच्या परिस्थितीशी कसा लढा दिला याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, त्यांनी राजकीय फटकेबाजीही केली. वर्षभरापूर्वी अॅम्ब्युलन्सचे भोंगे वाजत होते आता बाकीचे भोंगे वाजायला लागलेत अशा शब्दांत त्यांनी राजकीय फटकेबाजीही केली. (bells of ambulance were ringing a year ago now rest of bells are ringing says CM Thackeray)

मुख्यमंत्री म्हणाले, साधारण एकवर्षापूर्वी सर्व प्रार्थनास्थळ बंद होती. फक्त अँब्युलन्सचे भोंगे वाजायचे आता बाकीचे भोंगे वाजत आहेत. तेव्हा अँब्युलन्स मिळत नव्हते, साधे औषधोपचार करताना वाट लागायची. मुख्यमंत्रीपदाचा मला अनुभव नव्हता कोविडचा तर जगाला नव्हता. कोविडवर अद्याप औषध आलेलं नाही. आपण कोविड मॅनेज करु शकतो, पण त्यावर ट्रिटमेंट नाही.

फेब्रुवारीमध्ये याची वाढ व्हायला लागल्यानंतर कोविड फार भयंकर असल्याचं लक्षात आलं. त्यासाठी फील्ड हॉस्पिटल गरजेचे होते. त्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले. एखाद्या टीमला काम द्यायचं तर त्याचा कॅप्टन मजबूत असायला हवा नाहीतर टीम खेळणार कशी. पण त्यासाठी माझ्या टीमवर माझा आत्मविश्वास हवा आणि ते काम मी केलं. जर मुख्यमंत्रीच गर्भगळीत होऊन बसला असता तर आख्खं राज्य बसलं असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.