मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये बेली डान्स करणाऱ्या एका तरुंची व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर मुंबईकरांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.तर काही प्रवाशांनी प्रवासी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत स्टंट करणाऱ्यांवर कडक कारवाई कऱण्याची मागणी केली आहे. या व्हिडीओनंतर मध्य रेल्वे आरपीएफ पोलिसांनी दखल घेतली आहे.
कमी कालावधीत झटपट प्रसिद्धी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना बघितले. आता अनेक कलाकार सुद्धा लोकलचा गर्दीचा फायदा उचलून धावत लोकलमध्ये डान्स करण्याचे प्रकार घडत आहे. नुतकाच धावत्या लोकलमध्ये बेली डान्स करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये एक महिला धावत्या लोकलमध्ये बेली डान्स करत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये स्थानकाबाहेर बस स्थानकांवर डान्स करत असल्याची दिसून येत आहे. या व्हिडीओमुळे मध्य रेल्वेच्या कारभारावर अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थिती कऱण्यात येत आहे.
काही प्रवासी या व्हिडीओला निरुपद्रवी मनोरंजन म्हणून तर काहीजण याला तीव्र विरोध कर तरुनीवर योग्य कारवाईची मागणी करत आहेत. परंतु या घटनेची नेमकी तारिख आणि ठिकाण माहित नाही.
परंतु रेल्वे आणि लोहमार्ग पोलिसांमधील काही सुत्रांच्या मतानुसार हा व्हिडीओ सीएसएमटी ते सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यानचा आहे. ह्या व्हिडीओची दखल मध्य रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी घेतली आहे. हा व्हिडीओ कोणत्या लोकलमध्ये चित्रकरण केले आहे. याच्या तपास आरपीएफ पोलीस घेत आहे.
रेल्वेचे आवाहन -
हा व्हिडिओ , @mumbaimatterz वापरकर्त्याच्या 'X' या खात्यावरून पोस्ट करण्यात आलेला आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यात आलेल्या आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी एक प्रतिक्रिया पोस्ट केली, प्रवाशांना ट्रेन प्रवासादरम्यान अशा प्रकारच्या स्टंट टाळण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.