Corona Vaccination: गोरेगाव नेस्को जंम्बो कोविड सेंटर वयोवृद्धांची गर्दी

Corona Vaccination: गोरेगाव नेस्को जंम्बो कोविड सेंटर वयोवृद्धांची गर्दी
Updated on

मुंबई:  सोमवार 1 मार्चपासून कोरोनावर उपयुक्त लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. पालिकेच्या 5 आणि 3 खाजगी रुग्णालयात अशा एकूण 8 लसीकरण केंद्रावर तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सोमवारपासून सुरुवात झाली. मात्र कोविन अॅप वेळेत सुरु न झाल्याने गोरेगाव नेस्को जंम्बो कोविड सेंटर , घाटकोपर येथील एच. जे. दोशी हिंदू सभा रुग्णालय अशा विविध केंद्रांवर लस टोचून घेण्यासाठी लाभार्थ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, दुपारी 2 वाजल्यानंतर कोविन अॅप कार्यन्वित झाल्यानंतर प्रत्यक्ष लस टोचण्यास सुरुवात झाल्यानंतर लाभार्थ्यांची गर्दी आटोक्यात आल्याचे गोरेगाव नेस्को जंम्बो कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. निलम अंद्राडे यांनी सांगितले. 

गोरेगाव नेस्को जंम्बो कोविड सेंटर मध्ये सकाळी ९ वाजल्यापासून वयोवृद्ध आणि विविध आजारांनी त्रस्त लस टोचून घेण्यासाठी येऊ लागले. मात्र नोंदणी बंधनकारक असल्याने लाभार्थ्यांनी कोविन अॅपमध्ये नोंदणी करण्यास सुरुवात केली. मात्र अॅप सुरु होत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये काही काळ संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर दुपारनंतर काही सेंटरवरील अॅप सुरु झाले आणि लसीकरणाची सुरुवात झाली. गोरेगाव नेस्को जंम्बो कोविड सेंटर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 517 लाभार्थ्यांना लस टोचण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यात 45 ते 59 वयातील 68, 60 वयावरील 236 आणि हेल्थकेअर वर्कर्स, फ्रटलाईन वर्कर्स अशा एकूण 517 लाभार्थ्यांना लस टोचल्याचे त्यांनी सांगितले. 

हिंदू महासभा सेंटर साडे सहा तासांनी सुरु!

मुंबईत कालपासून तीन खासगी रुग्णालयात लसीकरणाला परवानगी देण्यात आली. घाटकोपर येथील हिंदू महासभा रुग्णालयात सकाळी 9 वाजल्यापासून लाभार्थी लस कधी मिळेल याची वाट पाहत होते. दुपारचे 3 वाजले तरी लसीकरणाला सुरुवात झाली नव्हती. पालिका अधिकारी आणि आयटी विभागाने येऊन प्रयत्न केल्यानंतर तब्बल साडे सहा तासानंतर लसीकरणाला सुरुवात झाली. या दरम्यान जे लाभार्थी लसीकरणाला आले होते त्यांनी घरी परतणे योग्य समजले. घरी गेलेल्या लाभार्थ्यांना रुग्णालयात बोलावून लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरण उशिरा सुरू झाल्याने सायंकाळी 6 वाजेपर्यंत लसीकरण करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

बीकेसीत ज्येष्ठांमध्ये उत्साह

दरम्यान बीकेसी येथे बहुतांश उपनगरातील ज्येष्ठ नागरिक लसीकरणाला उपस्थित होते. सकाळपासून रांगा लावून नोंदणी करत लस घेतली असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. तर काही लाभार्थी व्हील चेअर वरून आले असल्याचे ही सांगण्यात आले. दरम्यान रितसर नोंदणी केलेल्या ज्येष्ठ लाभार्थींना लसीकरणाच्या आणि लसीकरणा नंतरच्या सूचना देण्यात येत होत्या. दरम्यान, बहुतांश ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी होऊन ही लसीकरण घेता आले नाही. तर कित्येकांना नोंदणी करण्यास अडथळे आले. यावर बोलताना आय एम ए संघटनेचे माजी सचिव डॉ. पार्थिव संघवी यांनी सांगितले कि, ज्येष्ठ नागरिकांची कोविन अॅपवर सगळी नोंदणी लवकरात लवकर करावी. त्या नुसार ते लसीकरणाचा लाभ घेतील. शिवाय सर्व ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी सुरु असून लसीकरणासाठी धीर धरावा असे आवाहन ही डॉ संघवी यांनी केले.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Beneficiaries gathered Goregaon Nesco Jumbo Covid Center get vaccinated

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.