Mumbai News : तिकीट मशीन बिघडल्यास कंडक्टरच्या पगारातून पैसे कापणार; BEST कर्मचारी संतप्त

बेस्ट प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आज कर्मचारी निदर्शने करणार आहेत.
BEST Bus
BEST BusSakal
Updated on

BEST प्रशासनाने एक अजब फतवा काढला आहे. तिकीटाचं मशीन बिघडल्यास आता कंडक्टरच्या पगारातून पैसे कापले जातील, असा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे आता कर्मचारी संतापले असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या विरोधात आज कर्मचारी निदर्शने करणार आहेत.

BEST Bus
Sidhu Moosewala murder case : कुख्यात गुंड दीपक टिणूची मैत्रिण अटकेत

बेस्ट प्रशासनाने तिकीट काढण्यासाठीच्या ईटीआय मशीनची देखभाल कऱण्याबद्दल एक परिपत्रक काढलं आहे. त्यामध्ये कंडक्टर आणि इतर ग्राऊंड स्टाफला मशीनची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या तिकीट मशीनच्या सुट्ट्या भागांचे दरही या पत्रकात दिले आहेत. यामध्ये १५ पार्ट्स आहेत, त्यापैकी सर्वात महाग पार्ट म्हणजे मेन बोर्डचा खर्च ८ हजार ४३८ रुपये दाखवण्यात आला आहे.

BEST Bus
By-election : अंधेरीत काँग्रेस ठाकरे सेनेला तारेल?

या पैकी कोणत्याही पार्टमध्ये बिघाड झाल्यास, त्याचा खर्च कंडक्टरच्या पगारातून कापून घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आता बेस्टचे कर्मचारी संतप्त झाले आहेत. ते आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आज वडाळा आगारात हे कर्मचारी बेस्ट प्रशासनाविरोधात निदर्शने करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.