मुंबईकरांनो... सोमवारपासून बेस्ट धावणार; प्रवासी क्षमता 'इतकी' असणार

best bus.
best bus.
Updated on

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे मुंबईतील व्यवहार ठप्प आहेत. आता आर्थिक गाडा सुरू करण्यासाठी लॉकडाऊन शिथिल केला जात आहे. त्यामुळे सोमवारपासून दुकाने, कार्यालये उघडली जाणार आहेत. राज्य सरकारने इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार यांना काम करण्याची परवानगी दिली आहे. कामगार, दुकानदार, व्यावसायिक, कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बेस्ट बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.

लॉकडाऊनच्या तब्बल अडीच महिन्यांनंतर सोमवारपासून (ता. 8) बेस्ट बस पुन्हा धावणार आहे. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावणे बंधनकारक असेल. एका बसमध्ये एका आसनावर एक असे कमाल 30 जण व उभ्याने पाच प्रवाशांना मुभा देण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या 3300 आणि भाडेतत्त्वावरील 560 बसगाड्या आहेत. सुरुवातीला दररोज 2500 बसगाड्या धावणार असून, गरजेनुसार अधिक बस दिल्या जातील, असे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

बेस्ट आणि एसटी महामंडळाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित बस फेऱ्या सुरू ठेवल्या आहेत. दररोज बेस्टच्या 2000 फेऱ्यांद्वारे मुंबईतील डॉक्टर, परिचारिका, पोलिस, महापालिका कर्मचाऱ्यांना सेवा दिली जात आहे. ही सेवा आणखी काही दिवस सुरू राहील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

200 कोटींचे नुकसान 
बेस्ट बससेवा 23 मार्चपासून बंद आहे. लाॅकडाऊन घोषित होण्याआधी रोज 2800 बसमधून ३२ लाख नागरिक प्रवास करत होते आणि दोन कोटी 65 लाख रुपये महसूल मिळत होता. लाॅकडाऊनच्या 75 दिवसांत सुमारे 200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.