बेस्टनं 'त्या' कर्मचाऱ्यांवर केली कठोर कारवाई

बेस्टनं 'त्या' कर्मचाऱ्यांवर केली कठोर कारवाई
Updated on

मुंबई : कोरोना व्हायरसचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. मुंबई शहराला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला गेला. लॉकडाऊनच्या काळात मुंबईत बेस्टनं अत्यावश्यक सेवेसाठी बस सेवा चालविली. त्यात अनेक कारणांस्तव काही कामगार कामावर हजर राहू शकले नाहीत. अशांवर आता बेस्टनं कारवाई केली आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अँड ट्रान्सपोर्टनं (BEST) 14 वाहनचालक आणि कंडक्टर यांना कामावर हजर न राहिल्यानं बडतर्फ केलं आहे. 

गेल्या तीन महिन्यांपासून काही कामगार बेस्ट उपक्रमाने अत्यावश्यक सेवेत सहभागी झाली नाहीत, त्यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई केली आहे. बेस्टने केलेल्या कारवाईत चालक-कंडक्टर यांच्यासह इतर कामगारांचाही समावेश आहे.  दोन हजार कर्मचाऱ्यांपैकी 14 कर्मचारी गैरहजर असल्याचं आढळून आले. गेल्या महिन्यात काढलेल्या चार्जशीटमध्ये ही गोष्ट उघड झाली.  

सोमवारपासून बेस्टने या ड्रायव्हर्स आणि कंडक्टर यांना बडतर्फ करण्यास सुरुवात केली. 22 जूनला 11 जणांना आणि 23 जूनला दोन जणांना वेगवेगळ्या आगारातून बडतर्फ केलं गेलं. आणखी 300 कर्मचार्‍यांवर कारवाई  करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. बेस्टच्या धारावी, बॅकबे, देवनार, धारावी, दिंडोशी आगारातील 11 कामगरांना बडतर्फ केले आहे. त्यानंतर आणखी कामगारांनाही बडतर्फ करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

14 ड्रायव्हर्स आणि कंडक्टर यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतरही त्यांनी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात काम करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. दरम्यान, बेस्ट प्रशासनाच्या कारवाईने बेस्ट कामगार संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

मुंबईत बेस्ट बस प्रवास वाढला

15 जूनला सामान्य नागरिकांसाठीही बस सेवा सुरु केली गेली. त्यानंतर 15 जूनला प्रवाशांची संख्या अडीच लाख होती ती आता 22 जूनला वाढून तब्बल 8 लाख इतकी झाली आहे. 22 जूनपर्यंत तब्बल 8 लाख नागरिकांनी बसमधून प्रवास केला. म्हणजेच केवळ एका आठवड्यात 220 टक्क्यांची वाढ झाली. 

जास्तीत जास्त 25 लोकांना बसण्यासाठी आणि पाच स्टँडिंगसह बसमधून सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे. आम्ही रस्त्यावर बसची उपस्थिती वाढविली आहे. तीन आठवड्यांपूर्वी 1,800 बस रस्त्यावर होत्या. एका आठवड्यापूर्वी त्याचा आकडा 2,200 पर्यंत आणि आता आम्ही जवळपास 2,800 बसेस चालवित आहोत, असं अधिकारी म्हणाले.

उत्पन्नातही वाढ 

बेस्टचा महसुलाचा आकडा 10 लाखांनी वाढला आहे. बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ होत उपक्रमाच्या उत्पन्नाताही भर पडू लागली आहे. त्यामुळे महसूल 73 लाख 52 हजार रुपयांवर गेला आहे. मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या बससेवेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही तिकीट घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.