Mumbai BEST Bus : बेस्टच्या डबल डेकरला मुंबईच्या रस्त्यांचा दणका

विधान भवनाजवळील स्पीड ब्रेकर ठरतोय धोकादायक
Best double decker bus Mumbai speed breaker near Vidhan Bhavan dangerous
Best double decker bus Mumbai speed breaker near Vidhan Bhavan dangerous sakal
Updated on

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या नव्या कोऱ्या बसेससाठी मुंबई मेट्रोने तयार केलेला रस्ता डोकेदुखील ठरत आहे. मुंबई मेट्रो ३ च्या कामाअंतर्गत विधान भवन स्टेशनजवळील स्पीड ब्रेकर नव्या कोऱ्या बसेसला दणका देण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

बेस्टच्या ताफ्यात दाखल झालेल्या डबल डेकर बसलाही या स्पीड ब्रेकरचा दणका बसला आहे. त्यामुळे बसच्या मागील बाजुचा काही भाग हा दबला गेल्याचे निदर्शनास आले आहे. बेस्टच्या ताफ्यात नुकतीच लो फ्लोअर एसी डबल डेकर बस दाखल झाली. अवघ्या चार दिवसातच या बसला मुंबईतील रस्त्यांचा दणका बसला आहे.

विधान भवनासमोरील स्पीड ब्रेकरमुळे या नव्या कोऱ्या डबल डेकर बसला दणका बसला आहे. खुद्द बेस्टच्या ड्रायव्हर्सकडूनही अशा पद्धतीच्या असमान स्पीड ब्रेकरबाबत तक्रारी आहेत. मोठ्या प्रवाशांनी भरलेली बस नेतानाच स्पीड ब्रेकरवर बस ड्रायव्हर्सची कसोटी लागत आहे.

याआधी चाचणीतही स्पीड ब्रेकरचा अडथळा या लो फ्लोअर बसेसला दिसून आला होता. विधानभवनानजीकचा स्पीड ब्रेकर हा अतिशय धोकादायक असून अजुनही दुरूस्त न केल्याची तक्रार ड्रायव्हर्सची आहे.

जुन्या डबल डेकरच्या तुलनेत या नव्या इलेक्ट्रिक बसची रचना लो फ्लोअर पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक स्पीड ब्रेकरवर बस जपून चालवण्याचे आव्हान हे बेस्ट चालकांसमोर आहे. असाच काहीसा अनुभव बसच्या प्राथमिक चाचण्यांच्या वेळीही आला होता.

त्यामुळे जोवर विधान भवनासमोरील हा धोकादायक स्पीड ब्रेकर दुरूस्त होत नाही, तोवर हे आव्हान कायमन राहणार आहे. डबल डेकर प्रमाणेच याआधीच्या काही बसेसलाही या स्पीड ब्रेकरचा मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.