मुंबई: बेस्टच्या 54 कामगारांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून बेस्ट प्रशासन म्हणते फक्त 9 कामगारांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. प्रशासन ही आकडेवारी लपवत असल्याचा आरोप बेस्ट कामगार कृती समितीने केला आहे.
कोरोनाच्या काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या कामगारांकडे बेस्ट प्रशासनाचे लक्ष नाही. कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 11 जून ते 13 जुलै या काळात कामगार मूक निदर्शने करणार आहेत.
बेस्टच्या 700 जामगारांना क्वारंटाईन केले आहे. 350 पेक्षा अधिक कामगार कोरोनाचा बाधित आहेत. कामगारांना 50 लाखाचे विमा संरक्षण ध्यावे लागेल यासाठी बेस्ट प्रशासन मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने केला आहे. कामगार मुबाईबाहेर पालघर, उरण, खोपोली आदी भागात राहात आहेत.
काही कामगार गावी अडकले आहेत. त्यांना कामावर हजर राहण्यासाठी साधन नाही. कामगारांना 50 लाखाचे विमा कवच ध्यावे, वारसाला नोकरी ध्यावी आणि गैरहजर राहणाऱ्या कामगारांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करू नये, अशी मागणी कृती समितीने केली आहे.
कामगारांना कोरोनाच्या काळात सुरक्षेची साधने पुरवा, कामगारांच्या कुटुंबांची कोरोनाचा चाचणी करा, प्रत्येक आगारात 20 बेडचे क्वारंटाईन सेंटवर सुरू करा, वडाळा किंवा दिंडोशी या भागात कोरोनाचे तात्पुरते स्वतंत्र रुगणालय उभे करा आदी मागण्या कृती समितीने केल्या आहेत. कामगारांच्या मागण्यांसाठी ही मूक निदर्शने असतील अशी माहिती कृती समितीचे नेते शशांक राव यांनी दिली.
BEST employees will do Silent demonstrations on 11 to 13 july
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.