मुंबई : भरमसाठ विज बिलामुळे राज्यातील वातावरण तापलेले असताना महानगर पालिकेच्या एका कंत्राटदाराला बेस्ट कडून 'उणे' विज बिल पाठवले जात आहे. आश्चर्य म्हणजे महापालिका या कंत्राटदाराला विज बिलापोटी मासिक 1 लाख 75 हजार रुपये शुल्क देत आहे.
दादर येथील महापालिकेच्या मलनिःसारण केंद्रात गाळ सुकवणी यंत्र बसवले आहे. हे यंत्र चालविण्यासाठी महानगर पालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. कंत्राटदाराला त्याचे कामाचे शुल्क देण्याबरोबरच पालिकेकडून विज बिलापोटी दर महिन्याला सरासरी 1 लाख 75 हजार रुपय विज बिलाचा खर्च म्हणून दिला जातो. या कंत्राटदाराला जानेवारी महिन्यात 1 लाख 41 हजार रुपयांचे वीज बिल आले होते, तर एप्रिल महिन्यात 63 हजार 750 रुपये एवढे बिल आकारले होते.
महत्त्वाची बातमी : भाजपला पुन्हा मोठा दणका; उद्या आणखी एक नेता राष्ट्रवादीत करणार प्रवेश!
मात्र, जुलै महिन्यापासून विज बिल चक्क उणे येऊ लागले. जुलैचे वीज बिल उणे 71 हजार रुपये, ऑगस्ट महिन्याचे वीज बिल हे उणे 81 हजार होते, सप्टेंबर महिन्याची वीज बिल उणे 20 हजार 750 रुपयांचे पाठवले आहे. त्यामुळे पालिकेकडून विज बिलाची रक्कम मिळत असताना आता उणे बिल आल्यामुळे बेस्टही या कंत्राटदारला विज बिल देणार का असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.
मुंबईसह राज्य भरात भरमसाठ विज बिलाचा वाद पेटला आहे. राज्य सरकारने विज बिलात सुट न देण्याचा निर्णय घेतल्याने बेस्ट सह सर्वच विज पुरवठा कंपन्यांनी सुट देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेने आंदोलनाला सुरवात केली आहे. तर, नागरीकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. या कंत्राटदारने सौर उर्जा प्रकल्प बसवलेला असल्याने विज बिल कमी येत असल्याचा दावा पालिकेचे अधिकारी खासगीत करतात. सौरउर्जा प्रकल्प असेल तर पालिका या कंत्राटदारला विज बिलापोटी पैसे का देते असा प्रश्न देखील आता उपस्थीत होत आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुकूल यांनी हा प्रकार उघड केला आहे.
दरम्यान, सुट्टीवर असल्याने याबाबत माहिती घेऊन सांगू असे मलनिःसारण प्रचलन विभागाचे प्रमुख अभियंता सतिश चव्हाण यांनी सांगितले आहे.
best sends electricity bill in negative amount to one of its contractor in mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.