पुन्हा एकदा बेस्टच्या 'त्या' कामगारांवर कारवाईचा बडगा

पुन्हा एकदा बेस्टच्या 'त्या' कामगारांवर कारवाईचा बडगा
Updated on

मुंबई- कोरोना व्हायरसचा कहर अद्याप कमी झालेला नाही.  मुंबई शहराला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला गेला. लॉकडाऊनच्या काळात मुंबईत बेस्टनं अत्यावश्यक सेवेसाठी बस सेवा चालविली. त्यात अनेक कारणास्तव काही कामगार कामावर हजर राहू शकले नाहीत. अशांवर आता बेस्टनं कारवाई केली आहे. बेस्ट उपक्रमाने अत्यावश्यक सेवेत हजर राहण्याचे बंधन न पाळणाऱ्या ५७ कामगारांना आतापर्यंत बडतर्फ केले. आतापर्यंत सुमारे ४ हजार कामगारांना नोटीसही बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात बेस्टनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष सेवा चालविल्या होत्या. त्यामुळे कामगारांना कामावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र काही कारणास्तव काही कामगार कामावर हजर राहू शकले नाही. हे लक्षात घेऊनच बेस्टनं अशा कामगारांवर कारवाई केली आहे. 
बेस्टने केलेल्या कारवाईत चालक-कंडक्टर यांच्यासह इतर कामगारांचाही समावेश आहे. 

जूनपासून कठोर कारवाईस सुरुवात 

22 जूनला 11 जणांना आणि 23 जूनला दोन जणांना वेगवेगळ्या आगारातून बडतर्फ करण्यात आलं. त्यावेळी  बेस्टच्या धारावी, बॅकबे, देवनार, धारावी, दिंडोशी आगारातील 11 कामगारांना बडतर्फ करण्यात आलं होतं. मात्र ही कारवाई अयोग्य असून कामगारांवर करण्यात येणारी कारवाई मागे घेण्याची मागणी कामगार संघटनांनी केलीय. तर या सर्व कालावधीत सेवा न बजावू शकणाऱ्या कामगारांविरोधात उपक्रमाने कारवाईचे सत्र सुरू केलंय. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे.

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ

लॉकडाऊन उठवण्यास सुरुवात झाल्यापासून बेस्टच्या फेऱ्यात एका महिन्यात एक हजारानं वाढ झाली आहे. एवढंच नाही तर प्रवासीही दहा लाखांनी वाढलेत. त्यामुळे बेस्टचं दिवसाचं उत्पन्न ९० लाखांवर गेले आहे. अनलॉक करण्याची प्रक्रिया ८ जूनपासून सुरु झाली. त्यादिवशी बेस्टच्या २२०० फेऱ्यांचा लाभ अडीच लाख प्रवाशांनी घेतला होता. बेस्टनं आता पास विक्रीही सुरु केली असून २९ ठिकाणी ही विक्री सुरु करण्यात आली आहे. बसमधून प्रवास करताना जास्तीत जास्त 25 लोकांना बसण्यासाठी आणि पाच स्टँडिंगसह सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक आहे.

BEST take action against workers not present work lockdown

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.